भारतासह विदेशात लेवा आयडॉल सिंगिंग २०२० स्पर्धेचा फेसबुक ग्रुपवर विक्रम
फेसबुक ग्रुप वर ८५ हजार सदस्य पैकी ११५० स्पर्धकांनी घेतला सहभाग
हंबर्डी – “लेवा आयडॉल सिंगिंग – २०२० ही ऑनलाईन गायन स्पर्धा, लेवा टीचर्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने “लेवा पाटीदार कम्युनिटी” या फेसबूक ग्रुप वर आयोजित करण्यात आली होती, समाजातील सुप्त कलागुणांना चालना मिळावी, लहानापासून थोरा पर्यंत प्रत्येकाला या उपक्रमाच्या माध्यमातून आपली कला सहजतेने सादर करता यावी, या गोष्टीचा विचार करून लेवा आयडॉल सिंगिंग – २०२० हा उपक्रम शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या समन्वयक बंधु-भगिनींच्या सहकार्याने राबविण्यात आला, विशेष म्हणजे या उपक्रमाला खूप प्रतिसाद मिळाला व तब्बल ११५० च्य जवळपास स्पर्धकांनी हा आनंद देणारा सोहळा साजरा केला, एका प्रकारे उत्साहाचं, चैतन्याच वातावरण निर्माण झाले होते, या स्पर्धेत खेड्यातून, शहरातून, परदेशातून देखील स्पर्धक सहभागी झालेत. लॉक डाऊन च्या काळात निरुत्साही झालेले समाजमन, या स्पर्धेमुळे ताजेतवाने झाल्याचे भासू लागले मोठ्या संख्येने समाज बांधव स्पर्धकांना लाईक व कमेंट याद्वारे प्रोत्साहित करू लागलेत, हजारो लाईक व कमेंट स्पर्धकांना मिळू लागल्यात व त्यातून एक नवचैतन्य सर्वत्र पसरले. अगदी दोन वर्षाच्या लहान मुलांपासून ते ते ८५ वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. परदेशातील समाजबांधवांचा सहभाग हा वाखाळण्याजोगा होता. समाजातील गायक कलाकारांना या स्पर्धेद्वारे व्यासपीठ मिळाले व ओळख मिळाली. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली होती.
गट अ (जुनिअर्स)बाल-कुमार मुले-मुली,गट ब (युवा)युवा स्त्री व पुरुष,गट क (वरिष्ठ)वरिष्ठ स्त्री व पुरुष,गट ड युगल गीत (वरिष्ठांना प्रोत्साहन म्हणून)असे गट तयार करून या स्पर्धेमध्ये दि. १०/०८/२०२० ते २०/०८/२०२०पर्यंत समाविष्ट होण्याचे आव्हान करण्यात आले, २ऑक्टोबर २०२० ला सहभागी स्पर्धकां मधून विजेते निवडले गेलेत, समाजातील सर्व स्तरावरून या स्पर्धेला व स्पर्धकांना उदंड असा प्रतिसाद मिळाला समाजातील विविध फर्म कडून स्पर्धेसाठी पारितोषिक स्मृतिचिन्ह पुरवण्यात आली आहे, माननीय माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी व डॉ. प्रमोद महाजन नाशिक, श्री. रवींद्र चौधरी सर, श्री पुरुषोत्तम पिंपळे, पुणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेचे कौतुक व्हिडिओच्या व मेसेज द्वारे केलेले आहे. हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी स्पर्धकांना लाईक कॉमेंट्स देऊन स्पर्धेचा उत्साह द्विगुणित केला. अशा या स्पर्धेमध्ये खालील स्पर्धक विजेते ठरलेले आहेत.
गट अ (मुले)-चि. मानस गोपाळ पाटील वरणगाव,चि. भार्गव आशिषकुमार राणे डोंबिवली,चि. वेदांत राजेंद्र कुमार फेगडे भुसावळ, गट अ (मुली)-कु. केजल चंदन पाटील नशिराबाद,कु. साक्षी नरेंद्र पाटील नागपूर,कु. अनुष्का नवनीत किनगे पुणे, गट ब (पुरुष)-कु. सौरभ किशोर कोल्हे जळगाव,कु. अमित एकनाथ राणे पुणे ,मनोज भालचंद्र भंगाळे उल्हासनगर,कु. घनश्याम प्रकाश सरोदे वापी, गट ब (महिला)-साक्षी अनिल वाणीजळगाव, तेजस्वी यतीन नेहते डोंबिवली, प्राजक्ता रामा बऱ्हाटे डोंबिवली,भाग्यश्री राजू भंगाळे, भुसावळ,गट क (पुरुष)-गोपाळ निवृत्ती पाटील, वरणगाव, यशवंत मनोहर पाटील उर्फ बाबा पाटील, सावदा, सुभाषचंद्र मधुकर भंगाळे, भुसावळ, डॉ विजय विनायक पाटील बुलढाणा ,गट क (महिला)-विजयश्री कोलते पुणे,जयश्री संजय पाटील ऐरोली नवी मुंबई,डॉ. छाया विश्वनाथ चौधरी भुसावळ,चारुलता प्रकाश चौधरी, जळगाव,गट ड (युगल गीत)डॉ. सदाशिव भोळे आणि सौ डॉ. शांतला भोळे नागपूर, संजय इच्छाराम चौधरी पुणे आणि हर्षा दिलीप चौधरी, डोंबिवली,डॉ. मिलिंद आर पाटील आणि डॉ. जानव्ही एम पाटील, भुसावळ,याची उत्कृष्ट गायक म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हीवर्स चॉईस अवॉर्ड- हर्षित रवींद्र राणे जळगाव फाल्गुनी चौधरी पुणे, राजेश भालचंद्र भंगाळे उल्हासनगर, राहुल राणे पुणे, कैलास पद्माकर देशमुख, अटलांटा, अमेरिका, विनायक रामदास रडे, जळगाव,अंजली अशोक बोरोले, ठाणे,संजय वसंत कोल्हे चेंबूर आणि जया पाटील जळगाव, विशेष पुरस्कार पराग तुकाराम पाटील आणि डॉ अनुप्रीती पराग पाटील (वांद्रे, मुंबई. ) विशेष सन्मानचिन्ह गं. भा. सुमन एकनाथ पाटील, वय – 85, गंगाधर वामन पाटील, वय – 82 श्री दिनकर एन खर्चे, वय – 81, उत्तेजनार्थ बक्षीस कु. देवश्री राजेश भंगाळे, (उल्हासनगर) लेवा पाटीदार कम्युनिटी या फेसबूक ग्रुप वर अश्या प्रकारच्या विविध कला-गुण, कौशल्य व समाज उपयोगी स्पर्धांचे आयोजन होत असते. समाजातील कला-संगीत क्षेत्रातील मान्यवर विद्या शरदचंद्र भंगाळे, उत्पल लक्ष्मण चौधरी, पुनम चौधरी-पाटील, डॉ जयंती पराग चौधरी, पियुष प्रमोद भिरूड, सुवर्णलता पाटील, उत्कर्ष किरण नेमाडे, नेहा ज्ञानेश्वर नाफडे, हर्षल हरी राणे, यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या सर्व कार्यात लेवा पाटीदार कम्युनिटी ग्रुपचे ॲडमिन नरेंद्र पोपट महाजन पुणे, संजय वसंत कोल्हे चेंबूर, स्वाती पाचपांडे, मनीषा धांडे तसेच सकल लेवासमाज मंडळे, (नाशिक) महाराष्ट्र लेवासमाज कार्यकर्ते ग्रुप एकता मित्र परिवार, नाशिक सकल लेवासमाज मंडळे, इंडिया यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच सौ मनीषा बेंडाळे, डॉ ज्योती महाजन, श्री. विनोद इंगळे, लेवा उत्थान फांडेशन, नोबेल टुरिझम अँड मार्केटिंग, मॅनेजमेंट फॉर ऑल, ओवी एंटरप्राइजेस, पुणे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, कल्याण, जी बी सॉफ्टरोनिक्स यांच्या कडून पारितोषिक देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहेत.
लेवा टीचर्स फाऊंडेशनचे नितीन नारायण सरोदे आणि उपक्रम समन्वयक निशाताई अत्तरदे, प्रतिभा चौधरी, विजया जंगले, भाग्यश्री पांचपांडे, सुवर्णा फेगडे, सुरेखा पाटील, लीना पाटील, कुंदा झोपे, संध्या बोंडे, सुनिता येवले. जागृती नेहेते, गिरीश भंगाळे, प्रा. मयूर इंगळे, प्रा. चेतन पाटील, प्रा. नवनीत के पाटील, प्रा. संजय सी झांबरे, डॉ. प्रा. श्रीकांत चौधरी, शैलेंद्र महाजन, निखिल राणे, किरण चौधरी, सनीत पाटील यांनी योगदान दिले.