भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ वार्ड क्र. 45 मध्ये शिक्षक दिन साजरा
अंबरनाथ, जाफर वणू – थोर शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. “भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक” असतो. हे विचार लक्षात घेत भारतीय जनता पार्टी अंबरनाथ प्रभाग क्र. 45 भावी उमेदवार सर्जेराव माहुरकर ह्यांनी दि. 05 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधुन प्रभागातील सन्माननीय शिक्षकांच्या घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा कार्यालय प्रमुख राजेंद्र अप्पा कुलकर्णी, महिला वॉर्ड अध्यक्षा सौ. श्रेया झेमसे, गुजराती सेल महिला अध्यक्षा सौ. अर्चना बिपीन परमार, युवक वॉर्ड अध्यक्ष महेश तावरे, उत्तर भारतीय आघाडी सरचिटणीस कुमारी हिना गुप्ता, सौ. शारदा स्वामी, बाळा सुंदरम सर, प्रभाकर नंबियार, जॉन ॲलेक्स, कैलास जाधव, डोंगरे सर, प्रदिप पाटील, प्रविण साटम, विजय जाधव, किरण गायकवाड ह्यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.