भारतीय जनता युवा मोर्चा नेवासा शहराच्या वतीने नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
नेवासा, अमोल मांडण – कोरोनाच्या या महामारीत जेवढे जबाबदारी सरकारी कर्मचाऱ्यांची आहे. तेवढीच जबाबदारी नेवासा नगर पंचायत सफाई कर्मचार्यांची होती. या कोरोणाच्या महामारीत पूर्ण पणे योगदान दिले आहे ते विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांचा सन्मान भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह व थोर विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा नेवासा शहरातर्फे नगरपंचायतच्या पुरूष व महिला सफाई कामगारांचा छोटासा सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतिक शेजूळ, सरचिटणीस शिवा मोरे, निखील जोशी, उपाध्यक्ष रितेश कराळे, अनिल परदेशी, महेश लबडे, आकाश देशमुख,अनंता डहाळे, चिटणीस किरण दारुंटे, कोषाध्यक्ष नीलेश शेंडे आदी उपस्थित होते.