भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बोरघर / माणगांव,प्रतिनिधी – मंगळवार दिनांक २३ जून रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केंद्रीय कार्यकारीणी महाराष्ट्र प्रदेश, मुंबई प्रदेश यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अॅड.आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील जनतेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महाभयंकर निसर्ग चक्रीवादळात कोकणातील बहुतांश लोकांची राहती घरे आणि आंबा काजूच्या बागायती उध्वस्त झाल्या. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात लोकांच्या घरातील किंमती वस्तू, अन्न धान्य, कपडे आदींचे प्रचंड नुकसान झाले.
या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना सामाजिक आणि मानवतेच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करण्यासाठी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप या निस्वार्थ भावनेतून मदत करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने मदतीचा हात पुढे केला असून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री आदरणीय भिकाजी कांबळे, उपाध्यक्ष सुशील खाडे, सचिव पंढरीनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव सागर भालेराव आणि भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
‘या’ राज्यात वाढवला ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});