भारतीय मजदूर संघातर्फे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्य परिचरिकांचा सन्मान
निफाड,दि 23 (प्रतिनिधी)ः
समाजात जीवन जगत असताना आपणही या समाजाचे देणे लागतो त्याच प्रमाणे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्राचा नावलौकिक व्हावा व आपल्या हातूनही त्या क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने पारिचारिका काळातही प्रामाणिकपणे कार्य करत आहेत त्यांचाही सन्मान होणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने प्रेरित होऊन भारतीय मजदूर संघातर्फे कोरोना महामारीच्या काळात गेले वर्षभर कोविड सेंटर मधील रूग्णांना औषध व सर्व प्रकारची सेवा दिल्याबद्दल परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे ,भा.म.संघ महिला प्रमुख स्मिताताई कुलकर्णी, भा. म. संघ जिल्हा सचिव अशोक महाजन ,नाशिक जिल्हा सर्कल सेक्रेटरी दिनेश जोशी यांच्या मार्गदर्शनाने तसेच ग्रामपंचायत सदस्य लासलगाव ,व सामजिक कार्यकर्ते दत्ता पाटील, समृद्धी महिला पतसंस्था चेअरमन रजनी ताई कुलकर्णी, निफाड ता. मुख्य महामार्ग प्रमुख RSS विशाल सोनवणे, लासलगाव मंडल प्रमुख RSS दत्ता वाघ यांच्या शुभहस्ते प्राथमिक केंद्र निमगाव वाकडा ,ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथील परिचारिकांना कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी डॉ शेळके ,डॉ पाटील, डॉ आहेर यांचे सहकार्य लाभले. यावेळी भा. म.संघ लासलगाव उपविभाग प्रमुख किरणजी गांगुर्डे ,राजेंद्रजी कुलकर्णी उपस्थित होते.
@@ भारतीय मजदूर संघातर्फे परिचारिका दिनानिमित्य कोविड सेंटर मधील परिचरिकांचा सन्मान खरे तर आज संपूर्ण जग या महामारीत भयग्रस्त झाले आहे औषध नाही जे आहे त्याची शाश्वती नाही तरी ही आपली नैतिक जबाबदारी ओळखून परिचारिका हा घटक रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा करीत आहे भय इथले संपत नाही तशी वस्तूस्तिथी असताना रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून कार्य करणारा हा घटक आज खऱ्या अर्थाने सन्मानास पात्र आहे. सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून या परिचरिकांना जसे रुग्ण सेवेस कार्यरत केले तसेच कोव्हीड काळात खाजगी सेवेत असणाऱ्या परिचरिकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व त्यांना ही शासकीय सेवेचा सर्व लाभ मिळावा यासाठी भविष्यात प्रयत्न करू असे भारतीय मजदूर संघ महिला प्रमुख स्मिता कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले.