भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पुणे जिल्हा सचिवपदी शीतल शेखे
पुणे, प्रतिनिधी- सॉफ्टवेअर अभियंता व सामाजिक कार्यकर्त्या शीतल शेखे यांची नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या पुणे जिल्ह्याच्या सचिवपदी निवड करण्यात आली.
तसेच त्या एनजीओ फ्रेंड्स ऍकॅडमी या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान व अनुभव पाहुन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.
संपुर्ण देशामध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे विविध सामाजिक उपक्रम युवकांच्या साहाय्याने राबविण्यात येतात. त्यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो.
या संस्थेच्या पुणे जिल्हा सचिवपदी शीतल शेखे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष त्रिवेणीकुमार कोरे यांनी दिले.या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
“निसर्ग” चक्रीवादळाने “उमटे” गावातील जनजीवन विस्कळीत