मजुरीसाठी बेहाल असणार्‍या मजुराची ग्रामसेवकांकडून होतेय हेळसांड – कामगार नोंदणीपासून होतेय अडवणूक

0 167

माजलगांव,प्रतिनिधी:- बांधकामा कामगारांना शासकिय योजनाचा लाभ मिळवण्यासाठी कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्राकरिता ग्रामसेवकांकडून अडवणूक केली जात आहे. कोव्हिड-१९ च्या पार्श्‍वभुमिवर मजुरावर संसाराचा गाडा ओढण्यासाठी जिवघेणी कसरत करावी लागत आहे, अशा मजुरीसाठी बेहाल असणार्‍या मजुरांची हेळसांड चालवली असल्याने प्रशासनाने वेळीच लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई च्या वतीने बांधकाम व इतर बांधकाम कामगारांचे काम सातत्य नसलेले, अस्थायी व दैनंदिन स्वरूपाचे काम आहे. यामुळे कामगारांना एकापेक्षा जास्त मालकांकडे काम करावे लागते. त्यासाठी बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम कलम ३३ प्रमाणे ग्रामपंचायतीने ग्रामसेवकामार्फत बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यानी त्यांच्या अखत्यारितील सर्व ग्रामपंचायतीना त्यांचेमार्फत देण्याबाबत परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. परंतू अनेक ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांकडून ९० दिवसांचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी कामगार नोंदणीसाठी अडवणूक केली जात आहे.

कोव्हिड-१९ च्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन पाळण्यात आले. त्यामुळे मागील तीन महिण्यापासून कामगारांच्या मजुरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी मजुरीसाठी बेहाल असणार्‍या मजुरांची ग्रामसेवकांकडून अशा परिस्थितीत हेळसांड होत आहे.

– शासनाच्या योजनापासून राहतायत कामगार वंचित
बांधकाम कामागारासह इतर कामगारांना ३३ योजनाव्दारे शासकिय लाभ मिळतो. यात जिवन विमा, अपघात विमा, कामगारांच्या मुलांना शिक्षण, प्रसुतीसाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतू कामगार नोंदणीपासून ग्रामसेवकांकडून अडवणूक केल्या जात असल्याने ते शासकिय योजनापासून वंचित राहत आहेत.

कामगार नोंदणीपासून कामगारांना ग्रामसेवकांकडून वंचित ठेवले जात आहे. त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्यास अडवणूक केली जात असून ती तात्काळ थांबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेख सादेक यांनी दिला आहे.

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!