मनमाडमध्ये वयोवृद्धासह चिमुकल्याचा कोरोनावर मत

0 107

मनमाड – मनमाडमध्ये कोरोना बाधितावर उपजिल्हा रुग्णालयामार्फत उपचार घेत असलेल्या चिमुकल्यासह तेरा वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे.हे रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना आज घरी पाठविण्यात आले.यावेळी प्रशासनाच्या वतीने पुष्पवृष्टि करण्यात आली असून त्यांना रुग्नवाहिकेतुन घरी सोडण्यात आले.

देशात राज्यात आणि जिल्ह्यात कोरोणाच्या संसर्गजन्य आजार वाढत चालल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण असताना योग्य ती दक्षता औषध उपचार आवश्यक मेडिकल उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर मात करीत शहरातील तेरा रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. येथील कोवीड केअर सेंटर मधून या रुग्णाना निरोप देण्यात आला. प्रशासनातर्फे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.तर प्रशासन आणि वैद्यकीय सूत्रांनी ही याबद्दल समाधान व्यक्त केले. या सर्व रुग्णांना शासनाच्या रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पोहच करण्यात आले. या तेरा रुग्णांमध्ये चार लहान मुले सहा महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.केळकर,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जी.एस.नरवणे यांनी कोरोना केअर सेंटरच्या प्रवेशद्वारावर यशस्वी उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णांचे स्वागत केले. कोरोणावर यशस्वी मात केल्याबद्दल त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले.यावेळी कोरोना केअरचे प्रमुख डॉ.संतोष जगताप,नोडल ऑफिसर डॉ.रवींद्र मोरे.डॉ.साधना शिंदे,एकनाथ बनसोडे डॉ.महेश देशमुख,जयश्री सुर्वे,डॉ. अभिजीत त्रिभुवन,डॉ.नितीन परदेशी,डॉ.विशाल वाघ,पालिकेतील सीटू संघटनेचे कॉ.रामदास पगारे पालिकेचे अधिकारी अजहर शेख उपस्थित होते.कोरोना हा आजार पूर्णतः बरा होतो त्यामुळे घाबरून जाऊ नका योग्य ती दक्षता घ्या आणि उपचार घेतल्यास यातून मुक्तता मिळते अशी भावना यावेळी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त केली.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जी.एस. नरवणे म्हणाले की आज मनमाडच्या केअर सेंटर मधून तेरा रुग्ण योग्य ते उपचार घेऊन कोरोना मुक्त झाले. वैद्यकीय मार्गदर्शनानुसार त्यांच्यावर कोविड-१९ मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात आले या अगोदरही दहा रुग्णांना कोरोना मुक्त झाले असून रुग्णांनी योग्य तो प्रतिसाद दिला आणि उपचार झाल्यामुळे हे सर्व रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी जात आहेत याचे समाधान वैद्यकीय क्षेत्रामध्ये निश्चितच आहे.तर कोरोना मुक्त रुग्णाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतांना समाधान वाटत आहे.येथील कोरोणा केअर सेंटर मधून रुग्ण कोरोना मुक्त निघाले ते आपल्या घरी जात आहेत ही समाधानाची बाब आहे.त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले रुग्णांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे कोरोणाला घाबरून न जाता त्याचा योग्य सामना करा नागरिकांनीही कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी.आणि नियम पाळावे.अशी अपेक्षा आम्ही सर्व प्रशासन व्यक्त करीत आहे.मनमाडच्या कोविड-१९ केअर सेंटर मध्ये आता कोरोणाचे आठ पॉझिटिव्ह आणि १२ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती डॉ.दिलीप मेनकर यानी दिली आहे.

error: Content is protected !!