मनमाड राष्ट्रवादीतर्फे फेस शील्ड मास्कचे वितरण
मनमाड – मनमाड येथील डॉ. व पोलिस सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राज्यभरात वितरण करण्यात येत आहे त्यानिमित्त मनमाड राष्ट्रवादी तर्फे शहरातील डॉक्टर व पोलीस यांना वाटप करण्यात येत आहे देशांमधील राज्यातील कोरोना प्रादुर्भावा वाढत असून रूग्णालयाच्या साठी लढण्यासाठी लढा देणाऱ्या डॉक्टरच्या सुरक्षित साठी महत्वाचे आहे त्या दृष्टिकोनाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट वतीने देणगी नव्हे तर डॉ.व पोलिस यांच्या साठी तयार मास्क वितरण करण्यात येत असल्याचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब व राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार साहेब यांनी केले खाजगी रुग्णालयात सुरू ठेवण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत संपूर्ण जग करोनाशी अशी लढत असताना डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रवादीतर्फे मास्कचे सेट तयार करण्यात आले तसेच मनमाड येथील जिल्हा उप रुग्णालय येथील सर्व डॉक्टरांना व नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते सर्व डॉक्टर्स नर्स यांना फेस शील्ड मास्कचे वितरण करण्यात आले तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माहिती दिली आहे