मनसेच्या शिष्टमंडळाकडून कोरोनाच्या संकटकाळी महत्वाच्या मागण्यांसाठी पेण तहसीलदारांना निवेदन

0 58
पेण, वार्ताहर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व अमित राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसामान्यांच्या मागण्याकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयाला मनसेच्या शिष्टमंडळाने संदिपदादा ठाकुर यांच्या नेतृत्वाने स्थानिक पत्रकारांसोबत भेट देऊन वैद्यकिय अधिकारी डाॅ.स्वप्नील जाधव यांच्याकडुन उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या संकटकाळी कोव्हिड-१९ वरील संशयित रुग्णांवर दिवस रात्र उपचार करणाऱ्या डाॅक्टर्स,परिचारीका व सफाई कामगारांच्या समस्या जाणुन घेतल्या,तसेच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनसेने त्वरीत यावर कारवाई करिता पेण तहसिलदार डाॅ.अरुणा जाधव यांना निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली.यात मनसेने केलेल्या जनसामान्यांकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड-१९ उपचाराकरिता केलेल्या प्रमुख मागण्या
१) उपजिल्हा रुग्णालयातील संशयित करोना रुग्णांची स्वॅब टेस्ट महाराष्ट्र राज्य शासनाने जनसामान्यांकरिता मोफत करावी.
२) दिवस रात्र करोनाच्या संकटवेळी उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांच्या मदती करीता स्थानिक पेण तालुका व पेण शहर डाॅक्टर्संने सहकार्य करावे तसेच योग्य ती कार्यवाही करित आदेश द्यावेत.
३) रुग्णालयातील एखाद्या कोरोना रुग्णाची तब्येत खालावली तर सदर रुग्णांच्या ने-आण करण्याकरिता मोफत रुग्णवाहिका मिळावी.
४) गेल्या अनेक वर्षापासुन उपजिल्हा रुग्णालयात आर टी पी सी आर मशिन नसल्याने स्थानिक उद्योग समुहांच्या मदतीने सी एस आर फंडातून तातडीने कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी त्वरित आर टी पी सी आर मशिन मिळावी.
५) उपजिल्हा रुग्णालयात स्व-संरक्षण वैद्यकीय साहित्य (पी पी ई  किट ) चा पुरवठा तुरळक असल्याने तुटवडा आहे सगळेच डाॅक्टर एक स्व-संरक्षण वैद्यकीय साहित्य (पी पी ई किट ) तीन तीन दिवस वापरत असुन त्यांच्या व रुग्णांच्या आरोग्यास धोकादायक आहे.६) उपजिल्हा रुग्णालयातील सर्व करोना रुग्णांच्या वेळोवेळी उपचाराकरिता करोना हेल्पलाईन सुरु करावी.
सदर सर्व मनसेच्या मागण्या पेण तहसिलदार डाॅ.अरुणा जाधव यांनी सकारात्मकरित्या मान्य करित काही दिवसातच योग्य दिशेने प्रयत्न करून कोरोना सारख्या महासंकटावर सर्व मिळुन मात करु अशी ग्वाही दिली.मनसेच्या वतीने संदिपदादा ठाकुर यांनी पेण तहसीलदारांचे १०० पी पी ई किट दिल्याबद्दल व सकारात्मक चर्चेकरिता विशेष आभार मानले तसेच दोन दिवसांपूर्वीच मनसे नेते श्री. अमित राज ठाकरे ह्यांनी मुंबईतील काही महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी १,००० स्व-संरक्षण वैद्यकीय साहित्य (पी पी ई किट ) पाठवले आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीकरिता अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीकरिता मनसे कटिबद्ध आहे अशी ग्वाही संदिपदादा ठाकुर यांनी दिली.यावेळी मनसेचे मा.जिल्हा संघटक,रोजगार व स्वंयरोजगार संदिपदादा ठाकुर यांच्यासोबत स्थानिक पत्रकार दिपक लोके सर,प्रशांतजी पोतदार,तसेच मनसेचे प्रविण म्हात्रे, जिते विभागध्यक्ष अजिंक्य गांवड,दुरशेत शाखाध्यक्ष जयेंद्र डंगर,पेण पुर्व विभाग उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव,ज्ञानेश्वर ठाकुर हे उपस्थित होते.
error: Content is protected !!