मराठा सेवा संघ प्रणित,तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या किनवट तालुकाध्यक्ष पदी अरविंद सुर्यवंशी
किनवट, प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने करत असलेल्या मराठा सेवा संघाच्या प्रबोधन चळवळीतील योगदान लक्षात घेता हे कार्य आपणास अधिक व्यापक रीतीने करता यावे या उद्दात हेतूने मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष आदरणीय अँड पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी महाजन साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास दादा पाटील साहेब मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर तसेच तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने तसेच मराठा सेवा संघाचे किनवट तालुकाध्यक्ष डॉ. प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या किनवट तालुकाध्यक्ष पदी अरविंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नियुक्ती पत्र देतांना मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव काळे, अनिल गुंजकर,बाळकृष्ण कदम आशिष कऱ्हाळे पत्रकार किरण ठाकरे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट संतोष डोंनगे रितेश मंत्री आकाश इंगोले आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकाराम महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवराय छत्रवीर संभाजीराजे संत तुकडोजी महाराज भारत देशातील पहिल्या महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या प्रेरणेने मराठा सेवा संघाचा व तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचा प्रबोधनात्मक विचार समाजातील सर्वस्तरात आपल्या माध्यमातून पोहोचून आपणाकडून समाजाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य अविरत घडत राहो ह्याच करिता आपल्या पत्रकार बांधवांच्या अडी-अडचणी सोडवून संघटन वाढवून समाज प्रबोधनाचे कार्य उत्कृष्टपणे व्हावे हीच आपल्या नियुक्तीबद्दल बद्दल हार्दिक शिवेच्छा.