महात्मा बसवेश्वर यांची 912 वी जयंती सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचुन साजरी
पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने आज रघुनाथ ढोक यांच्या परिवाराने घरीच महात्मा बसवेश्वर महाराज यांची 912 वी जयंती महात्मा फुले यांचे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक वाचून साजरी केली. 900 वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर महाराज यांनी अनिष्ट परंपरा, रुढी, अंधश्रद्धा कर्मकांड, विषमता, भेदभाव, जातीयता स्त्री दास्यत्वा मध्ये गुरफटून मरगळलेल्या समाजाला प्रस्थापितांच्या विरोधात कणखरपणे उभे राहण्याची शक्ती देऊन चातुर्वर्णाला विरोध करून आंतरजातीय विवाह लावून क्रांतिकारी काम केलेची रघुनाथ ढोक यांनी माहिती दिली. आज देखील या विज्ञानयुगात संत महात्मा बसवेश्वर, महात्मा जोतीराव फुले ,छत्रपती शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे काळाची गरज आहे म्हंटले.या लॉकडाऊन नंतर आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून विवाह सोहळे साधेपणाने झाले पाहिजेत अशी आशा व्यक्त करून अजूनही लोक सरकारला लॉक डाऊन काळात सहकार्य करीत नसल्याचे दिसते त्यामुळे लोकानी घरातच राहून सुरक्षित रहावे असे देखील आव्हान करून वेळेचा सदुपयोग करावे असे म्हणून पुढे आर्थिक मंदीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत कुटुंबासमवेत चर्चा केली तरी वावगे होणार नाही असे देखील ढोक म्हणाले.सत्य की जय हो.