महानगरपालिकेनेच महावितरणचे ४० कोटी वीज-बिल थकवले; पथदिवे बंद

0 197

नांदेड, गजानन जोशी – कोरोना संक्रमणाच्या काळातील थकीत वीज बिल नागरिकांनी भरले नाही ही माहिती मिळाली होती,पण मागील काही वर्षांपासून वीज बिलाची रक्कम महानगरपालिकेनेच भरली नसल्याची माहिती मिळाली.

 

महानगरपालिका तर्फे मागील बरेच दिवसांचे ४० कोटी बिल थकीत आहे,आतापर्यंत (दि.१३ मार्चपर्यंत) ७.५ ते ८ कोटी रुपये रक्कम भरले असल्याची माहिती मिळते साधारण ३० कोटी रक्कम थकीत असल्याचे समजते,हे बिल भरले नसल्याने सद्यस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंदच असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास जाणवतो आहे,हे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे व गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

तसेच नांदेड शहरातील महानगरपालिकेचा कर भरण्यात सद्यस्थितीत अनेक नागरिकांनी कर भरला असल्याने त्यांना सोयीसुविधा पुरविणे मनपातर्फे बंधनकारक आहेच.

nanded mc

मालमत्ता कर,पाणीपट्टी कर जर भरला नाही तर नळ कट करणे अश्या नाहक त्रास देण्यासारख्या कारवाई महानगरपालिका करते आहे,पण स्वतः बिलाविषयी थकीत राहून जनतेला थकीत पैसे भरा अन्यथा नळ कट करू हे शहाणपण शिकवणारी मनपा अधिकारी यांच्या टीमला आयुक्त साहेब यांचे काय आदेश असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महानगरपालिकाच जर महावितरणचे वीज बिल भरत नसेल तर जनतेला तगादा का लावावा?
महावितरण कडून १००% वीज बिल भरल्याशिवाय स्ट्रीट लाईट (पथदिवे) चालू करण्यात येणार नाही,असे मनपा उप-अभियंता यांनी महावितरण कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले…

error: Content is protected !!