महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात संपन्न
मनमाड,प्रतिनिधी-आज मनमाड येथे राजपूत समाजाच्या वतीने भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी.
देशात व राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज 480 वी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची जयंती सर्व राजपूत बांधवांनी आपापल्या घरी शासनाचे पालन करून सोशल डिस्टन ठेवून आनंदात साजरी केली तसेच मनमाड शिवसेना शहर महिला आघाडी शहर समन्वयक सौ कविताताई परदेशी यांनी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच जयंती साजरी करत असताना पत्रकार सतीश सिंह परदेशी ललित परदेशी देवाशिष परदेशी उपस्थित होते त्यांनी संपूर्ण देशातील महाराष्ट्रातील सर्व राजपूत बांधवांना महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
ब्रेकिंग – परभणीत संचारबंदी लागू; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव