महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस अससोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास तांदळे यांना विधान परिषदेवर निवड करा-बाबासाहेब कुकडे

0 275

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :- कोणत्याही समाज कार्यात अग्रेसर असलेले कैलास तांदळे यांना विधानपरिषदेवर निवग करावी अशी मागणी बाबासाहेब कुकडे यांनी केली आहे. कैलास तांदळे हे गेल्या अनेक वर्षांपासून फार्मसिस् क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सतत सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात त्यांनी मेडिकल स्टोअर्स असो की फार्मसिस् सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आवाज उठवला आहे. विविध आंदोलनात सक्रिय सहभाग असता ते सर्व समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशिल राहतात.

“उत्साह” शब्द म्हणजे नेमके काय हे समजून घ्यायचे असेल तर कैलास यांचे कडे पहावे लागेल.मनुष्या चे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते हे यांना पाहिल्या लक्षात येते मागील कित्तेक वर्षा पासून कोणताही गाजावाजा न करता ते फार्मसी फिल्ड करता काम करत आहेत,फार्मासिस्ट ने कोणतेही काम त्यांच्या कडे घेऊन गेल्यास ते होतेच, हा अनुभव आल्याने आपोआप फार्मासिस्ट हृदय सम्राट हा किताब त्यांना मिळाला.

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल मध्ये/संबधित खात्यात/मंत्रालयात फार्मासिस्ट चे प्रश्न मांडायचे असोत की चहा वाटप आंदोलन असो,की ऑन लाईन औषध विक्रीस विरोध असो कैलास तांदळे आघाडीवर असतात औषध क्षेत्रा सोबत निगडित प्रश्ना करता वेगळे मंत्रालय असावे ही त्यांनी केलेली महत्वा ची मागणी होती,तिचे महत्व आताच झालेल्या औषध खरेदी घोटाळ्या नंतर सरकार च्या लक्षात आले.

वनखात्यात फार्मासिस्ट च्या नियुक्ती व्हावी म्हणून त्यांनी सरकार दरबारी दबाव आणला FDA मध्ये निवृत्त अधिकाऱ्याच्या भारतीस त्यांनी तातडीने विरोध केला!आपल्या क्षेत्रा मध्ये घडणाऱ्या बारीक सारीक घटनांवर त्यांचे लक्ष असते आणि त्याचाच परिपाक त्यांच्या कार्यात दिसतो कैलास तांदळे या फार्मसी क्षेत्रातील युवा नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी दिल्यास संधीचे सोने करतील म्हणून विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी बाबासाहेब कुकडे यांनी केली आहे.

स्वारातीला साडेनऊ कोटी नाही तर आता १७ कोटी रुपये किमतीची ‘३.० टेस्ला एमआरआय मशीन’ मिळणार!

 

error: Content is protected !!