महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

0 126

बीड – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहु नये. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. शासनाच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्हयात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवु नये, असे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!