महावितरणच्या सावळा गोंधळाचा फटका झरीकरांना
अनिल जोशी
झरी जि.परभणी,दि 13ः
झरी ता.परभणी येथे मागील सात दिवसापासून शेताती विजपुरवठा बंद असून गावात देखील विजेचा लंपडाव सुरु झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.गावात उपकेंद्र असुनही त्यावर कोणाचे निययंत्रण राहीले नसल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.
झरी येथे परभणी येथून विज पुरवठा होते.गावात उपकेंद्र आहे,परंतु उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मागील काही दिवसापासून सुट्टीवर गेले आहेत.झरी येेथील विज उपकेंद्रात वारंवार बिघाड होत असल्याने गावातील विज देखील गायब झाली आहे.झरी शिवारातील शेतील विज पुरवठा करणाऱ्या वाहीनीत बिघाड झाल्याने मागील सात दिवसापासून शेतातील विज नसल्याने शेतकरी जनावरांना पाणी पाजवण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत.सध्या पेरणीचे दिवस आहेत.पाऊस पडत असला तरी अद्याप नदी,नाले यात पाणी आले नसल्याने गुरांना पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या गावातून 11 केव्ही लाईन जिंतूर ते परभणी रोडवरील लोक वस्तीतून गेली आहे.या वाहानीच्या तारा जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी तुटून पडत आहेत.दोन दिवसापुर्वी वाऱ्यामुळे तार तुटून एका बालकाजवळ पडली.सुदैवाने तो बालक काही सेकंदाच्या अंतराने तिथुन बाजुला गेल्याने मोठी दुर्घटना टळली.याबाबत अनेकदा महावितरण कंपनीला कळवुन देखील तारा बदल्या जात नसल्याने आणखी किती दिवस लोकांच्या जिवाशी खेळणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
अपुरे कर्मचारी,रोहित्र 40
झरी उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा आहे.गाव आणि परिसरात 40 डिपी आहेत.त्यामुळे एकाच कर्मचाऱ्यावर या डिपीचे फ्युज,दुरुस्ती करावी लागते.
झरी वसुलीत अव्वल
या गावात विज कंपनीने वसुली मोहीम राबवुन 15 लाख वसुली केली आहे.त्यामुळे असे असतानाही गावात मात्र विजेचा लंपडाव का असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.