महावितरणच्या ७ हजार जागा भरणार, ८ दिवसात परीक्षेचा निकाल होणार जाहीर

0 160

पुणे- जुलै २०१९ मध्ये घेतलेल्या महावितरणमधील विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक पदाच्या ७ हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या ११ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ऊपकेंद्र सहाय्यकच्या २००० जागासाठी आॕनलाईन परीक्षा होऊन एक वर्ष झालं . या प्रलंबित जागा येत्या आठ दिवसांत या भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे रखडलेली ही भरती प्रक्रिया आता पूर्ण होणार असल्याने निवड प्रक्रियेतील उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्यात. महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 2 हजार तर, विद्युत सहाय्यक पदाच्या 5 हजार अशा एकूण 7 हजार जागासाठी भरती प्रक्रिया जुलै २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती.

महावितरणच्या जुलै २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार, २ हजार उपकेंद्र सहाय्यक व ५ हजार विद्युत सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसात संबधितांना सेवेत रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशा आशयाचे ट्विट ऊर्जामंञी डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

या साठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. उमेदवाराचे वय 18 ते 27 या दरम्यान असणे गरजेचे आहे. विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहिल. निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षासाठी दर महिन्याला 9000, दुसऱ्या वर्षात 10000 आणि तिसऱ्या वर्षात 11000 मानधन मिळेल. या मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजा होईल.

महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या खाजगी सावकारांवर मोक्का कायदया अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करा- मा.श्री.दिपक कांबळे

 

error: Content is protected !!