माऊलींचा पालखी सोहळ्यातील गोपाळ काला प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न

0 235

आळंदी देवाची –
काला करती संतजन | सवे त्यांच्या नारायण
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमीत्ताने गोपाळ काला कोरोणाच्या संकटामुळे यावर्षी श्री क्षेत्र पंढरपूर ऐवजी श्री क्षेत्र आळंदी येथील गोपाळपुरातील मंदीरात प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या गजरात वारकरी, भाविकांनी गोपाळकाला भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

आज सकाळी पहाटे नेहमी प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकांवर संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पाडून सकाळी ठिक आठ वाजता पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार यांनी माऊलींच्या चल पादुका हातात घेऊन गाडीतून गोपाळपूराकडे मार्गस्थ झाले, गोपाळपुरातील मंदिरात काल्याचे अभंग म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात काला संपन्न झाला यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, व्यवस्थापक माऊली वीर,श्रींचे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरू, राहुल चिताळकर, श्रीकांत चौधरी, पुजारी यज्ञेश जोशी, राहूल जोशी, माऊली दिघे, वेद लोंढे, विठ्ठल घुंडरे आणि आळंदीकर नागरीक उपस्थित होते.

मेगा भरती : 17 हजार पदांसाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे
read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!