माजलगांवच्या प्रभारी नगराध्यक्षांच्या पुत्राची कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांस दमदाटी

0 135

नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार , नातेवाईकांना पायबंद करण्याची मागणी
माजलगांव,(प्रतिनिधी):- येथील नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांचे पुत्र डॉ.अरूण मुंडे यानी नगराध्यक्षांचा बोर्ड लावण्या काढण्याच्या कारणावरून कर्मचार्यासह नगरसेवकांला शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी पालिकेत घडली .

याप्रकरणी नगरसेवक राज सय्यद अहेमद सय्यद नूर यानी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करत प्र.नगराध्यक्षांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी पायबंद करावा , अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.माजलगांव नगर परिषद कायमच वादाच्या भोवर्यात सापडलेली आहे . नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या रिक्त पदावर उपाध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांच्या नगराध्यक्षपदाचा पद्भार सोपवला आहे .

प्रभारी नगराध्यक्षा याचे पुत्र डॉ.अरूण मुंडे व दिपक मुंडे हे सतत पालिकेचा काम पाहण्यास सुरवात केली असून कर्मचार्यासह नगरसेवकांवर रूबाब झाडत असल्याची तक्रार आहे . याबाबत सोमवार दि .२० रोजी नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या नावाच्या बोर्डवरून वाद समोर आला . प्रभारी नगराध्यक्ष असतांना थेट नगराध्यक्ष म्हणून सुमन माणिकराव मुंडे यांचा बोर्ड लावलेला होता , तो बोर्ड काढण्यासाठी कर्मचारी कर्तव्य पार पाडत असतांना प्रभारी नगराध्यक्षांचे पुत्र डॉ.अरूण मुंडे याने कर्मचार्यास बोलावून घेवून विनाकारण तुल काय करायचे त्या बोर्डाचे , हरामखोर तु तुझ काढ आणि निघ असे धमकावले व सदर बोर्ड घेवून नासधूस केली .

यावर उपस्थित असलेले नगरसेवक राज सय्यद अहेमद सय्यद नूर यानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता , त्यांना उध्दट वागणुक दिल्याची घटना समोर आली . यावर संतापलेले नगरसेवक राज सय्यद अहेमद सय्यद नूर यानी प्रभारी नगराध्यक्ष याचे पुत्र डॉ.अरूण मुंडे व दिपक मुंडे हे कुठल्याही पदावर अथवा कोणीच नसतांना कर्मचार्यांना व सदस्यांना दमदाटी करून अपमानीत वागणुक देत आहेत , यावर तात्काळ प्रभारी नगराध्यक्षा यांनी आपल्या नातेवाईकांवर आवर घालण्याबाबत निर्देशित करावे , असे तक्रारीत नमूद करत डॉ.अरूण मुंडे व दिपक मुंडे यांना नगर परिषदेच्या परिसरात येण्यास मज्जाव करावा , अशी मागणी नगरसेवक राज सय्यद अहेमद सय्यद नुर यांनी जिल्हाधिकार्यांसह मुख्याधिकार्यांकडे निवेदनाव्दारे सोमवारी केली .

सांगा पिक विमा भरायचा कसा

error: Content is protected !!