माजलगांवच्या मोंढ्यात आवक वाढली, लॉकडाउनमध्ये साडेचार कोटींची तूर खरेदी

0 98

माजलगांव, प्रतिनिधी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या फुलेपिंपळगाव येथील नवीन मोंढ्यामध्ये लॉकडाउनच्या काळात मोंढा सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून महिनाभरातच साडेचार कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी झाली आहे .

एकवीस दिवसाच्या लॉकडाउनमध्ये मोंढाही बंद करण्यात आला होता . त्यामुळे मोंढा सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या . सोशल डिस्टन्सिंग व इतर गोष्टींचा काटेकोरपणे अवलंब करीत या मोंढ्यात लॉकडाउनमध्ये मालाची खरेदी होणार असल्याचे आवाहन बाजार समितीने केले होते . शेतकऱ्यांकडे घरात पडून असलेला शेतमाल तत्काळ विक्रीस येऊ लागला . सुरवातीला मोंढाही बंद आणि शासकीय तूर , हरभरा खरेदी केंद्रही बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या . अखेर माजलगांवचा मोंढा सुरू झाल्याने शेतमाल विक्रीचा प्रश्न मार्गी लागला आहे .

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी करण्यात येत आहे . तर या नवीन मोंढ्यामध्ये निर्जतुकीकरण कक्षही उभारण्यात आलेला आहे . शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी अथवा शेतमालाच्या पैशांसाठी अडचणी असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा .
– अशोक डक , सभापती , बाजार समिती .

खरेदी केलेले धान्य
ज्वारी ……… १५५७ क्विंटल
हरभरा ……… ३७७२ क्विंटल
बाजरी , ……… २३७ ९ क्विंटल .
तूर …………… ९ ० ९ ५ क्विंटल
सोयाबीन ……… १२५४ क्विंटल
मूग . ……………. २ ९ क्विंटल
गहू ………………… ६४७ क्विंटल

असे आहेत भाव प्रतिक्विंटल
गहू ………. २५०० ते ३००० रुपये
ज्वारी ……. १६०० ते ३७०० रु .
बाजरी ……. ११२५ ते २२०० रु .
हरभरा ……. ३२०० ते ३७०० रु .
तूर ……….. ४२०० ते ५२०० रु .
सोयाबीन …. २ ९ ०० ते ३५ ९ ७ रु .
मूग ………………… ७५०० रु .



error: Content is protected !!