माजलगांव तालुक्यात जिनींग चालक फक्त व्यापाऱ्यांचा कापूस घेवू लागले शेतकऱ्यांचा कापूस परत पाठविला, कारवाईची मागणी
माजलगांव, धनंजय माने – सध्या लॉकडाऊन असले तरी कापूस खरेदी विक्रीला परवानगी देण्यात आली . मात्र जिनींग चालक कापूस खरेदी करत असतांना अनेक अटी आणि शर्ती घालू लागले . खराब कापूस असल्याचे सांगून शेतकन्यांच्या कापूस अत्यंत कमी भावात घेवूलागलेतर काही जिनींगचालककापूस घेण्यास नकार देवू लागले . काल भोपा येथील जिनींगवर शेतकन्यांचा कापूस परत पाठविला . या प्रकरणी संबधीतांविरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकन्यांकडून केली जात आहे . व सरसकट कापूस घेण्याची मागणी करण्यात येवू लागली . लॉकडाऊन असल्यामुळे ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरीच आहे . काही दिवसापासून कापूस खरेदी विक्रीला मंजूरी देण्यात आली . त्यामुळे शेतकरी जिनींगवर कापूस विक्री करू लागले मात्र जिनींग चालक शेतकन्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करु लागले . कापूस खराब असल्याचेकारण सांगत अत्यंत कमीभाव लावूलागले . हाच कापूस व्यापाऱ्याचा मात्र घेतला जावू लागला . व्यापारी आणि ग्रिडरमध्ये मिली भगत असल्याने व्यापाऱ्यांच्या कापसाला सूट दिली जात आहे . काल माजलगांव तालुक्यातील भोपा येथील जिनींगवर शेतकन्याचा कापूस परत पाठविण्यात आला . या प्रकरणाकडे लक्ष घालून शेतकन्यांच्या कापून न घेणाऱ्या जिनींगवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .
———चौकट————
बीडच्या मोंढा परिसरातही जिनींगवर शेतकऱ्यांची पिवळणूक
बीड मोंढा परिसरात असलेल्या जिनींगवरही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे . शेतकऱ्यांनी कापूस आणल्यानंतर त्याची पाहणी ग्रिडर करतात आणि त्यात थोडी कवडी असली की तो कापूस घेतला जात नाही . कापूस खरेदी करण्याच्या सुचना प्रशासनाच्या असतांनाही ग्रिडर मनमानीपणा करु लागले . पाठीमागचा कापूस थोडा खराब असतोच . थोडा खराब असणारा कापूस सगळाच नाकारणं योग्य आहे का ? कापूस विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना जिनींग चालकांशी वादावादी करण्याची वेळ येते . त्यासाठी जिनींगचालकांनी व ग्रिडरांनी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा , आधिच शेतकरी वेगवेगळ्या संकटामध्ये घेरलेला आहे . त्यांना त्रास देण्याचे काम जिनींगवाल्यानी करु नये .