माजलगांव धरणातून सिंधफना नदी पात्रात २दलमि पाणी सोडले

0 86

अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी

माजलगांव, प्रतिनिधी – सद्याच्या पाणी टंचाई परिस्थिती लक्षत घेता माजलगांव धरणातून गोदावरी नदी व सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी मंजुरी मिळाली  होती त्या नुसार १६मे शनिवार रोजी एका दरवाज्यातून सिंधफना नदी पात्रात २दशलक्ष घनमिटर पाणी आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांच्या उपस्थितीत माजलगाव सोडण्यात आले आहे.

लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

या विषयी अधिक माहिती अशी की  ३मे रोजी आ.प्रकाश सोळंकेंनी जिल्हाधिकारी, बीड व मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक,औरंगाबाद यांच्याकडे पत्राद्वारे नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मागणी बाबत सतत पाठपुरावा करून पाणी सोडणे कसे गरजेचे आहे हे लक्षात आणून दिले होते. याचा परिणाम म्हणून मुख्य अभियंता, औरंगाबाद. यांनी माजलगांव धरणातून सिंदफना नदीच्या पात्रात  २.०० द.ल.घ.मी.व गोदावरी नदीच्या पात्रात १.५० द.ल.घ.मी.पाणी सोडण्यास  मंजुरी दिली होती. त्या आदेशानुसार १६मे शनिवार रोजी माजलगांव धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदी पत्रात पाणी सोडल्याने नदी काठच्या गावांचा पाणी प्रश्न सुटणार असून  वन्यप्राणी ,पाळीव जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे आ. प्रकाश सोळंके यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत.

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…



error: Content is protected !!