माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमचे बाजीराव दराडे यांच्या हस्ते उद्घाटन

0 138

भंडारदरा,दि 17 ( प्रतिनिधी)ः राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत चाललेला आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यास सांगितले आहे. याचपार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव येथे ‘माझे कुटुंब, माझी जबाबबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, बांधकाम अभियंता बाळासाहेब धोंगडे, लाडगाव ग्रामपंचायत सरपंच सचिन झापडे, आर्जुन धोंगडे उपस्थित होते.

ही योजना १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वारघुंशी, बारी, पेंडशेत, वाकी, मान्हेरे, पाभूळवंडी, आंबेवंगन, शेणित, पाभूळवंडी, रंधा, टिटवी, शेलविरे, डोंगरवाडी, पिंपरकणे, बाभुळवंडी इत्यादी गावांमध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक डगळे, डॉ.सुशांत फलके व त्यांचे सहकारी प्रत्येक घरात तसेच गावांमध्ये जाऊन दोन महिन्यामध्ये दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी तसेच चेक द कोरोना डिटेक्ट कोरोना अँड ट्रीट कोरोना संदर्भात दवंडी देऊन माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाने केले आहे. या मोहिमेला आदिवासी नागरिकांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक डगळे यांनी सांगितले. अकोले तालुक्यामध्ये बहुंताश भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे राजूर, शेंडी, अकोले, समशेरपूर, कोतूळ ही बाजारपेठे बंद करण्यात आलेली आहेत. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॅक बेल्ट’ म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणे टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक डगळे, डॉ.सुशांत फलके व त्यांचे सहकारी प्रत्येक गावगावी करत आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ.डगळे दुहेरी संकटामध्ये सापडले आहेत. नुकतेच त्यांच्या पत्नीचे भाऊ एकदरे आश्रम शाळेचे मुख्यध्यापक किरण लेंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. यावेळी त्यांना डबा घेऊन जाण्यासाठी डॉ.डगळे यांची पत्नी व मुलगा जात होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीला व मुलाला देखील कोरोना झालेला आहे. अकोले येथील खानापूर तसेच संगमनेर येथे नेहमीच कोरोनाच्या डुट्या लागत असतात. अशाही काळात त्यांनी लाडगाव येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी यावे लागत आहे. एकीकडे कुटुंब आजारी असतांना त्यांना वेळ मिळत नाही

error: Content is protected !!