मोकाशींच्या व्यक्तीचित्रणाचा बी.ए ३ च्या अभ्यासक्रमात समावेश
आटपाडी , प्रतिनिधी – शेटफळे येथील स्थानिक ग .दि.माडगूळकर स्मारक समितीचे अध्यक्ष आणि मायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या ” दादासाहेब वस्ताद” या व्यक्ती चित्रणाचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात केला गेल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. सयाजीराजे मोकाशी यांची १७ पुस्तके प्रकाशीत असून डॉ. मोकाशी आणि डॉ . रंजना नेमाडे लिखित व्यावहारीक मराठी या संदर्भ ग्रंथाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , सोलापूर विद्यापीठ , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात मान्यता दिली गेली होती .
सोलापूर विद्यापीठात गेल्या ३ वर्षा पूर्वी बी.ए . भाग २ च्या आवश्यक मराठी मध्ये प्राचार्य विश्वासराव देशमुख आणि प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशीं च्या माणदेशी कथांचा समावेश केला गेला होता .
१९८५ पासून माणदेशाच्या साहित्यीक विश्वात अग्रगण्य म्हणून ओळखले जाणारे डॉ. सयाजीराजे मोकाशी यांना संपूर्ण महाराष्ट्रात आदराने पाहीले जाते . मोकाशी सरांच्या व्यक्ती चित्रणाचा बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल ग.दि. माडगूळकर स्मारक शासकीय समितीचे अशासकीय सदस्य , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी त्यांचे अभिनंदन केले .
८० वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात