मोटारसायकलची मोटारसायकला धडक देऊन कत्तीने वार

0 161

माजलगांव, प्रतिनिधी – शहरातील संभाजी चौक, बायपास रोडवर एका मोटारसायकल चालकाने दुसऱ्या मोटारसायकला पाठीमागून धडक दिली यात खाली पडलेला असतानाही मोटारसायकल स्वाराच्या हातावर कत्ती सारख्या धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून मोबाईल घेऊन पलायन केल्याची घटना घडली.

 

या बाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील केसापुरी येथील मँकनिक संजय रामेश्वर अप्पा सवादे हा युवक ९जुन मंगळवार रोजीच्या दुपारी ४वा.सुमारास माजलगांव शहरातील संभाजी चौक भागातील सागर ज्युस बार समोर मोटारसायकल वर जात असताना प्रकरणातील आरोपी दिपक यादव कांबळे रा.ब्रम्हगाव,ता.माजलगांव याने निष्काळजीपणाने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ची पाठीमागून धडक दिल्याने संजय खाली पडला आणि त्याच्या खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला हे दिपकने पाहिल्यावर त्यावर बुटाने मारून मोबाईल फोडला.दरम्यान घाबरलेल्या संजय गाडी निट बघून चालवता येत नाही का. असे म्हणताच दिपक ने त्याच्या कडे असलेल्या कत्तीने हातावर वार करून अंगठ्या गंभीर जखम केली. यानंतर हि आरोपीने पडलेला मोबाईल घेऊन पलायन केले. अशी फिर्याद ९जुन मंगळवार रोजीच्या रात्री ११:४०वा.शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येऊन गुरनं.१८१/२०२०वरुन आरोपी विरोधात भादंवि.कलम २७९,३२४, ३२७, ४२७, सह मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि. गायकवाड करत आहेत.



error: Content is protected !!