यश सोनवणे यांचे 86.31% गुण घेऊन बारावी परीक्षेत घवघवीत यश.

0 130

माझ्या यशाचे सर्व श्रेय हे माझ्या आई-वाडीलांचेच- यश सोनवणे

औरंगाबाद , प्रतिनिधी  – औरंगाबाद वाळूज महानगरातील स्व.भैरवमल तनवाणी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.यश सुरेंद्र सोनवणे याने इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून 86.31 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपदन केले आहे. सुरेंद्र सोनवणे व रुपाली सोनवणे यांचे चि.यश सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत स्व.भैरवमल तनवाणी उच्च माध्यमिक विद्यालय, बजाजनगर जि.औरंगाबाद मधून विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाला आहे.

चि.यश सोनवणे यांनी दहावीचे शिक्षण अल्फोंसा इंग्लीश हायस्कूल, बजाजनगर येथे 95.40 टक्के घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाला होता. तसेच त्याने बारावीच्या विज्ञान शाखेतून 650 पैकी 561 गुण घेऊन 86.31 टक्के घेऊन उतीर्ण झाला आहे. यापूर्वीही चि.यश सोनवणे यांनी विविध स्पर्धा परिक्षात यश मिळवले आहे.

कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता रात्रंदिवस केलेली मेहनत आणि शिक्षक व आई-वडील यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे आपण यश संपादन केल्याचे त्याने सांगितले. सह्याद्री प्रतिष्ठान कन्नडचे अध्यक्ष शिवराज पाटील यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, प्राचार्या अर्चना जाधव, ज्ञानभवन केंद्राचे केंद्रप्रमुख वैभव पवार व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्र परिवार, पत्रकार, नातलाग व सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले आहे.

धक्कादायक; नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

error: Content is protected !!