युवा मित्रच्या उपक्रमातून भीलवाड गावाला मिळणार जलसंजीवनी

0 109

वासोळ, प्रशांत गिरासे – तालुक्यातील भीलवाड येथे युवा मित्र सिन्नरच्या कार्यकारी संचालीका मा. मणिषाताई पोटे, असोसिएटेड डायरेक्टर मा.शितल डांगे, प्रकल्प व्यवस्थापक मा.अजीत भोर यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवाड येथील भिलवाड पाझर तलावातील वर्षानुवर्षे साचत आलेल्या गाळामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होत नव्हता. याची दखल घेत येथील शेतकरी व भिलवाड ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत सहकार्याने युवा मित्रच्या संकल्पनेतून आज टाटा ट्रस्ट मुंबई व घरडा केमिकल्स यांच्या सेस निधीतून गाळ काढण्याच्या कामाचे उदघाटन जि. प. सदस्या सौ. नुतनताई आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुनील आहेर, राजधेर गाळ उपसा समिती अध्यक्ष श्री रविंद्र जाधव सदस्य अभिमान जाधव, सदस्य केशव जाधव, सदस्य दशरथ जाधव, सुभाष शिरसाठ, कल्पेश बोरसे, दिलीप जाधव, दशरथ पुरकर, केशव पोपट जाधव, समाधान जाधव आणि इतर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापक मा. अजीत भोर, सर्वे इंजिनिअर धनंजय देशमुख, पाणी वापर संस्था समन्वयक भालचंद्र राऊत, देवळा समन्वयक सागर गुंड आदि मान्यवर कामाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने युवा मित्र संस्था सिन्नर तसेच टाटा ट्रस्ट व घरडा केमिकल्स कंपनीकडून मोठे काम येथील परिसरात उभे राहात आहे. म्हणून त्याचे आभार मानण्यात आले. या कामामुळे जलाशयात पाणीसाठा वाढणार आहे. भूगर्भातील पाण्याची पाण्याची पातळी वाढली जाणार आहे. याशिवाय परिसरातील शेतकर्यांना तलावातील सुपीक माती शेतीसाठी उपयोगी असल्याने येथील शेतकरी गाळयुक्त माती टाकुन आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी काम करणार आहे. येथील सर्व शेतकरी स्वतःच्या साधनाने गाळ वाहून नेऊन आपली शेती सुपीक करतांना त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे.

error: Content is protected !!