रज्जाक शेख रोटरीच्या ‘नेशन बिल्डर अवॉर्डने’सन्मानित
अहमदनगर – कोरोना प्रतिबंध कालावधीत पेमराज सारडा कॉलेज येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणपूर येथील प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक रज्जाकभाई शेख
यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड 2020” हा पुरस्कार सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य अजित बोरा, क्रॉम्पटन कंपनीचे क्वालिटी मॅनेजर प्रसन्न महाजन, स्नेहालयचे सुनिल रामदासी, संजय जोशी, अभय राजे व रोटरीचे पदाधिकारी ईश्वर बोरा यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
यावेळी जिल्हयातील शिक्षकवृंद कोरोना प्रतिबंध क नियम पाळून उपस्थित होते. सद्याच्या काळात वेगवेगळ्या कोरोना जनजागृती संदर्भात जबाबदारी घेऊन रज्जाक शेख यांनी काम पाहिले.परराज्यातील रेल्वेने येणारे व जाणाऱ्या प्रवासी तपासणी पथकात त्यांनी बेलापूर रेल्वेस्टेशन येथे नाईट ड्युटी बजावली.गरजवंत रुग्णाला अचानक रक्ताची गरज पडू शकते या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चार महिन्याच्या कालावधीत दोनदा स्वतः रक्तदान केले. आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली.स्टडी एट होम ही संकल्पना राबवताना मुलांना दररोज व्हाट्सएपच्या माध्यमातून घरचा अभ्यास दिला.ज्या मुलांकडे मोबाईल उपलब्ध नाही त्यांना स्वाद्याय पुस्तिका झेरॉक्स करून घरोघरी जाऊन दिल्या आणि शिक्षण प्रक्रिया खंडित राहू दिली नाही. मेसेजद्वारे ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन अभ्यासाच्या पीडीएफ नित्यनेमाने पालकांपर्यंत पोहोचवल्या. शैक्षणिक विडिओच्या युट्युब लिंक, कवितांच्या लिंक व चित्र पाठवाचन लिंक, स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांना दिल्या. कोरोना कालावधीत भर पावसाळ्यात शाळेत कोरोन्टाईन केलेल्या चाळीस मजुरांची तात्पुरत्या स्वरूपात पंधरा दिवसासाठी राहण्याची, पाण्याची व विद्युत प्रकाशाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले. या कालावधीत शासनाकडून उपलब्ध शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तक वाटपचे कार्य शंभर टक्के पूर्ण केले.
तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात वाढती लोकसंख्या व त्याचे वातावरणातील ओझोनच्या थरावर होणारे परिणाम याविषयावर मॉडेल बनवून द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत श्रीरामपूर गटाने तृतीय क्रमांक मिळवला. राज्यातील विविध वृत्तपत्रातून “खेळू करू शिकू” या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.सध्या शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘काव्यदरबार’ हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून देत आहे. ह्या सर्व कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब अहमदनगर टाऊनच्या वतीने हा ‘ राष्ट्र उभारणीचे शिल्पकार अवॉर्ड ‘देऊन रज्जाक शेख यांना गौरविण्यात आले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.