राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंतीनिमित्त आळंदीत अभिवादन
आळंदी देवाची – महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंतीनिमित्त आळंदी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे व नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर म्हणाल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले.तसेच महिलांच्या सन्मानाचा संदेश जनमानसात रुजावा याकरिता राष्ट्रसंत तुकडोजींनी महिला मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्याकरिता लघु उद्योगासाठी प्रेरित केले. त्यासाठी त्यांनी गावोगावी प्रचार वर्ग घेतले. त्यातून तयार झालेल्या महिलांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला. अनेक निराधार महिलांनाही त्यांनी आधार दिला.