रिलायन्स जिओमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

0 109

भारतात सर्वात मोठी, नावलौकिक असणारी टेलीकॉम कंपनी अर्थात रिलायन्स जिओने वेगवेगळ्या पदांकरता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीत होणाऱ्या भरती प्रक्रियेत अनुभवी किंवा फ्रेशर्स उमेदवारांनादेखील अर्ज करता येणार आहे. रिलायन्स जिओने २०० हून अधिक जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

shabdraj reporter add

या वेबसीईटवर जिओ कंपनीने पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहता येईल. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अ‌ॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अ‌ॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी चेन्नई विभागासाठी अर्ज मागवले आहे. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट-४ या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याविषयी IOCL ने परिपत्रक काढले असून आपल्या iocrefrecruit.in या वेबसाईवर भरती प्रक्रियेविषयी माहिती दिली आहे. IOCL एकूण १६ ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -४ पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. इच्छुक उमेदवार १९ फेब्रवारी २०२१ पर्यंत त्यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. एकूण १६ जागांपैकी ९ जागा खुला प्रवर्ग, ४ जागा ओबीसी प्रवर्ग, २ जागा एसी प्रवर्ग आणि एक जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित आहेत.

lokseva sticker

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • ज्युनियर इंजीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्यासाठी केमिकल/रिफाईनरी अ‌ॅण्ड पेट्रोकेमिकल या क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक
  • बीएससी (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) केलेल्या उमेदवारांनासुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात
  • खुला प्रवर्घ तसेच EWS च्या उमेदवारांसाठी कमीत कमी ५० टक्क्यांच्या गुणांची अट तर एससी/एसटीसाठी ही मर्यादा ४५ टक्के आहे.
error: Content is protected !!