रेल्वेतर्फे विशेष पार्सल गाड्यांमध्ये वाढ
भुसावळ,लियाकत शाह- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ज्या लोकांना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी आपल्या जवळ पासच्या स्टेशनमधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या शी संपर्क करावा व मागणीनुसार गाडीची फेरी वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. करमबेली-गुवाहाटी विशेष पार्सल गाडी डाऊन 00903 करमबेली-गुवाहाटी विशेष पार्सल गाडी 11 रोजी करमबेली हुन सहा वाजता सुटली असून ती 13 जून रोजी गुवाहाटी येथे 3.30 वाजता पोहोचणार आहे. अप 00904 गुवाहाटीकरमबेली विशेष पार्सल गाडी 14 रोजी गुवाहाटी येथून पाच वाजता रवाना होईल व दुसऱ्या दिवशी 16 रोजी 3.20 वाजता करमबेली पोहोचणार आहे. या स्थानकावर गाडीला थांबा विशेष पार्सल गाडीला डाऊन दिशेत भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, पंडित दिनदयाल उपाध्याय, पाटलीपुत्र, सोनपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, न्यू बोंगाइगाव तसेच अप दिशेला खंडवा, भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});