रेल्वेमंत्र्यांचा दौरा, कर्मचाऱ्यांच्या पायाला भोवरा
नांदेड, गजानन जोशी – जालना रेल्वेस्थानकावर रेल्वेमंत्री येणार कळाले की,सर्वच तिकीट तपासणाऱ्यापासून ते पोलीस कर्मचारी पर्यंत कामाला लागतात. कोणी साफसफाई तर कोणी नागरिकांची तिकीट तपासणी यात व्यस्त दिसते.
पण हा सगळा कर्मचाऱ्यांच्या पायाचा भोवरा इतर वेळी कधीही दिसत नाही,फक्त मंत्री महोदय आले की काम करतोय असे दाखवायचे,आणि इतर वेळी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त केंद्र शासनाचा पगार घ्यायचा असे का? याठिकाणी काही कर्मचारी मुजोर आहेत,ते तर स्वतःला मंत्री महोदय यांचे खूपच जवळचे आहोत असे मानतात,परंतु काम करण्यासाठी वेतन दिले जाते मुजोरी करण्यासाठी नाही,या अश्या कर्मचाऱ्यांना मंत्री महोदय ताळ्यावर आणणार का? हा सवाल सामान्य नागरिकांसमोर आहे.
रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्याला मिळाल्याने कर्मचारी कामाला लागले खरे,परंतु दिखाव्यापुरते नको तर प्रामाणिकपणे कामाला कधी लागणार?
रेल्वेतील फेरीवाले,प्रवासी यांच्याकडून चिरी-मिरी न घेता दंडात्मक कारवाईसाठी सामोरे येऊन आपला प्रामाणिकपणा कर्मचारी यांनी कायम दाखवायला हवा. प्रवाश्यांना विश्वास आहे की प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचारी यांची रेल राज्यमंत्री महोदय नक्कीच पाठ थोपटतील.