रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड फॉर आयडियल टीचर पुरस्काराने विजयकुमार जाधव सन्मानित
ठाणे, मिलिंद जाधव – मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा वेळूक येथे पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असणारे विजयकुमार जाधव यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या वतीने नेशन बिल्डर फॉर आयडियल टीचर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शाळेची पटसंख्या वाढवणे,विद्यार्थ्यांना समाज सहभागातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवून देणे ,कोरोना काळात प्रभावी ऑफलाईन शिक्षण देणे ,कला क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रगतीस मार्गदर्शन करणे ,स्वच्छ सुंदर शाळा परिसर या शैक्षणिक कामातून त्यांनी वेळूक शाळा प्रगतीपथावर आणली आहे.
शैक्षणिक कार्यासोबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले असून संघटनेच्या दानशूर सदस्य यांच्या सहकार्याने कोकण पूरग्रस्त निधी,कोरोना काळात वंचित घटकांना अन्नधान्य मदत,गरीब होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गंभीर आजारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आजवर एक हात मदतीचा योजनेद्वारे मदत त्यांनी केली आहे.हा पुरस्कार मिळाल्याने विजयकुमार जाधव यांच्यावर विविध स्तरावर अभिनंदमाचा वर्षांव होत आहे.
साजई ता.मुरबाड येथे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या अध्यक्ष उल्का सावला, सचिव गिरीश पोफळे व रोटरीचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख किशोर भोईर , काशिनाथ शेलवले, उल्हास घोलप ,कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष आनंद सोनकांबळे ,कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद सूर्यवंशी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश गुळवे यांनी विशेष मेहनत घेतली तर सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले.