लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर विवाहित तरुणाचा बलात्कार ?
माजलगांव,प्रतिनिधी:- माजलगांव तालुक्यातील जदीद जवळा येथील एका विवाहित महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून विवाहित पुरुषाने बलात्कार केल्याची घटना घडली . याबाबत हाती आलेल्या माहितीवरून नमूद गावातील विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून तु मला खुप आवडतेस तु माझ्या सोबत रहा , मी माझ्या पत्नीला घटस्फोट देतो व मी तुला सांभाळतो तु तुझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी दे म्हणून पिडीत महिलेस विश्वासात घेत आपण लग्न करु म्हणून त्या विवाहितेला फोन करुन बोलवून घेतले व तीच्या इच्छे विरोधात १७ / ०६ / २०२० ते ०८/०७/२०२० रोजी पर्यंत शारीरिक संबंध केले.
हा घडलेला प्रकार पिडितेने घरी येवून सांगितला त्यानंतर पिडीत विवाहितेन ८ जुलै बुधवार रोजीच्या रात्री १०:५२ वा.माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात विवाहित आरोपी विष्णू भगवान भाग्यवंत विरोधात गुरनं .१६६ / २०२० वरुन भादंवि कलम ३७६ ( २ ) ( एन ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके करीत आहे .
परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});