लासलगाव बाजार समितीत १३ दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू
उन्हाळ कांदा ४९३ नग, आवक अंदाजे १०३३७ क्विंटल, सरासरी १४०१ रुपये मिळाला बाजारभाव
निफाड, रामभाऊ आवारे – गत १३ दिवसापासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समित्या आज अखेरीस सुरू करण्यात आल्या असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज बाजार समित्या सुरु झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने सर्व बाजार समित्या बंद केलेल्या होत्या. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावला आज कांद्याचे लिलाव सुरु झालेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर आज ४९७ वाहनातील कांदा लिलाव जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशानुसार कोरोना कोव्हीड चे नियम पालन करून सकाळी सत्रात लिलाव पार पडले. आज उन्हाळ कांद्याला सरासरी १४०१ तर कमाल १६३५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलेल्या आदेशानुसार लासलगाव बाजार समितीने रविवारी कोरोना चाचणीस सुरवात केली होती. सोमवारी सकाळ पर्यंत लासलगाव येथील ६९२ विंचुर येथील २६९ तर निफाड येथे २६० व्यक्तींचे चाचणी अहवाल असे एकुण १२२१ व्यक्तींचे कोरोना कोव्हीड अहवाल करण्यात आले असल्याची
माहीती लासलगाव बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. शासनाच्या नियमांचे पालन करत
लासलगाव बाजार समितीत आज केवळ पाचशे कांदा घेऊन येणारे वाहनांनाच प्रवेश देता येईल असे सांगितले होते त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर विक्रीसाठी आणलेल्या कांदा ट्रॅक्टर,पिकअप, टेम्पो आदी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीचा कोरोना अहवाल पाहूनच आतमध्ये केवळ नोंदणी केलेल्या वाहनाना प्रवेश दिला जात होता. बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे , सुनील डचके, संदिप होळकर ,प्रकाश कुमावत डी.पी.होळकर, गोरख विसे, गणेश आहेर, संदिप निकम, शेजवळ यांच्यासह कर्मचारी यांनी ही तपासणी करून वाहने बाजार समितीच्या आवारात सोडण्यात आली. या अगोदर बाजार समितीचे वतीने बाजार समितीच्या आवारातील सर्व कांदा ट्रॅक्टर व इतर वाहनांवर सॅनेटरायझर्सची फवारणी करण्यात आली.प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही.
दोन किलोमीटरपर्यंत कांदा ट्रॅक्टरच्या रांगा-
लासलगाव बाजार समितीत आज केवळ पाचशे कांदा घेऊन येणारे वाहनांनाच प्रवेश देत येत असल्याने प्रवेशद्वाराबाहेर सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या आहेत.आज लिलाव सुरू होताच किमान ७०० तर जास्तीत जास्त १४०१ रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर होत होता. १३ दिवसानंतर बाजार समिती सुरू होणार असल्याने सर्वच कांदा उत्पादक शेतकर्यांनी गर्दी केल्याने दोन किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांग लागली होती.
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल—
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
उन्हाळ कांदा – ०७०० – १६३५ – १४०१
लाल कांदा – आवक नाही.
मका – १५३१ – १६२० – १५६९
सोयाबीन – ४००० – ७००० – ६८५२
गहू – १४९१ – २१९३ – १७३१
बाजरी – १२०० – १४४१ – १४४१
हरभरा – ३४०० – ५५०० – ५४०
सभापती सुवर्णा जगताप यांनी मानले शेतकऱ्यांचे आभार
पुरणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेल्या बाजार समित्या तब्बल १३ दिवसानंतर सुरू झाल्या. लासलगाव बाजार समितीत सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन लासलगाव मुख्य बाजार येथे ४९३ ट्रॅक्टर कांद्याची ,विंचूर येथे ४०७ ट्रॅक्टर आवक, निफाड येथे ३८८ ट्रॅक्टरची आवक झाली.जवळपास ९० % शेतकरी बांधवानी रॅपिड टेस्ट करून आणली होती.ज्यांनी रॅपिड टेस्ट करून आणली नव्हती त्यांनीही स्वयंस्फूर्तीने टेस्ट करून आणली. बाजारसमितीमध्ये लॅबचे सहाय घेऊन त्याची पूर्तता केली.कोठेही गर्दी न करता शांततेत लिलावाची प्रक्रिया पार पडली त्यासाठी लासलगाव पोलीस फोर्सचे ही सहाय्य लाभले.. त्यासाठी लासलगाव व निफाड पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद..लिलाव यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व शेतकरी बंधू, व्यापारी,मापारी,हमाल व बाजार समितीचे सर्व कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन. यापुढे सर्वांनी असेच सहकार्य करावे ही नम्र विनंती.सुवर्णा जगताप, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव.