लाॅकडाऊन मुळे माणगांव बाजारपेठेत मच्छीचा तुटवडा खवल्यांच्या घशाखाली घास उतरेना
माणगांव, विश्वास गायकवाड – कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मच्छीमारी करणार्या कोळी समाजाने आपल्या मच्छीमारी करणार्या बोटी खोल समुद्रातून बाहेर काढून समुद्र किनारी लावल्या मुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या बाजारपेठेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने तमाम मच्छी प्रेमींच्या घशाखाली घास उतरेना अशी त्यांची अवस्था झाली आहे.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस विस्तिर्ण असा अरबी समुद्र असल्याने या अरबी समुद्रात पापलेट, सुरमई, हलवा, रावस, सरगा, करली, वांब, कुपा, मुशी तथा शार्क, टोळ, ढोमी, कानटा, बांगडा, बोंबील, म्हाकळी, बोईट, पाखट, कोत्या, बळीवडा, खेकडे इत्यादी विविध प्रकारची वैविध्यपूर्ण मच्छी मुबलक प्रमाणात सापडते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड, म्हसळा आणि श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या तालुक्यातील कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय मच्छीमारी हाच आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यातील कोळी समाज शासन निर्धारित मच्छीचा प्रजनन काळ वगळता वर्षभर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात.
रायगड जिल्ह्यातील वरील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मच्छीमारी मच्छीमारी च्या माध्यमातून संपूर्ण देश विदेशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. या आयात निर्यातीच्या माध्यमातून
भारतीय अर्थव्यवस्थेत अब्जावधी रुपयांची उलाढाल होऊन अर्थ व्यवस्था सक्षम करण्यात समुद्री मच्छीमारीचा महत्त्वाची भूमिका आहे. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या मच्छीमारीवर संचारबंदीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे कोळी समाजाने आपल्या खोल समुद्रातील मोठ मोठ्या मच्छीमारी करणार्या बोटी खोल समुद्रातून बाहेर काढून समुद्र किनारी लावून आपली पारंपरिक मच्छीमारी सद्या बंद केली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील मच्छीमार्केट मध्ये समुद्री मच्छीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तमाम मच्छी प्रेमींच्या घशाखाली घास उतरेना अशी त्यांची अवस्था झाली आहे.