लॉकडाऊनमध्ये तहसीलदार लाभर्थ्यांच्या उंबरठ्यावर

0 72

– राष्ट्रिय कुंटुब अर्थसहाय योजनेचा दिला धनादेश
– गरजे समयी घरपोच मदतीने मानले आभार

चिमूर, निखिल खानोरकर – देशात कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याकरीता लॉकडाऊन घोषीत करून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे .कुणीही विणाकारण बाहेर पडू नये याकरीता विविध स्थरावर जनजागृती करण्यात येत आहे.अशा कठीण समयी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मानवतेच्या दृष्टिने त्यांच्या घरीच नेऊन द्यावे या उद्देशाने चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी राष्ट्रिय कुंटूब अर्थसहाय योजनेचा धनादेश काजळसर येथील लाभार्थी महिलांच्या प्रत्यक्ष उंबरठ्यावर जाऊन दिले .
लॉकडाऊन मूळे गरीब ,मजुर ,शेतकरी, शेतमजुर हवालदील झाला आहे.अनेकांचे जिवन जगणे कठीण झाले आहे .अशा परिस्थितीमध्ये शासकीय ,स्वंयसेवी तथा दानशुर व्यक्ती कडून विविध स्वरूपाची मदत करण्यात येत आहे .गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असा शासणाचा दंडक आहे .राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेद्वारा दारिद्र्य रेषे खालील कुटुंबातील कमावता सदस्स्याचा दुर्दैवाने मृत्यु झाल्यास कुटुंबातील सदस्यास विस हजार रुपये अर्थसहाय सहाय दिले जाते. या योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील सतरा प्रकरणे मंजूर झाली होती. त्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांचे मिळुन तीन लक्ष चाळीस हजार रुपयांचे धनादेश वाटपासाठी तयार करण्यातआाले होते.मात्र लॉकडाऊनमध्ये सध्या सार्वजनिक वाहतुकही शासनाने बंद असल्याने कार्यालय कसे गाठावे हा प्रश्न लाभार्थ्यापुढे होता .
सध्याच्या काळात रोजगार ,मजुरी बंद असल्याने हलाकीच्या परीस्थीती मध्ये अशा सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन धनादेश देऊन त्यांना मदत करावी असे चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी ठरविले .याच्या अंमलबजावणीस काजळसर येथील लाभार्थी शशीकला हरीदास नन्नावरे व सिमा अशोक रामटेके रा . मजरा ( बे ) यांचे घर गाठले .प्रत्यक्ष तहसीलदारच धनादेश घेऊन आल्याचे पाहून आनंदाने त्यांच्या डोळ्याला पाणी आले .विविध शासकीय योजनेच्या लाभाकरीता कार्यालयाच्या पायऱ्या झिजवुनही मदती साठी प्रतिक्षाच करावी लागते .तहसीलदाराने उंबरठ्यावर मदतीचा धनादेश दिल्याने त्यांनी तहसीलदारांचे आभार मानले . आर्थिक अडचणींवर मात करण्याबाबात मार्गदर्शन करून कुटुंबाची आस्थेने तहसीलदारांनी विचारपूस केली .प्रशासकीय अधिकाऱ्याच्या या आपूलकीने त्या महिला भारावल्या . याप्रसंगी भीसीचे अप्पर तहसीलदार परीक्षित पाटिल. काजलसरचे व मजरा (बे )चे तलाठी हजर होते.

error: Content is protected !!