लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या काळात देखील गॅस एजन्सीजकडून ग्राहकांची लूट

0 92

‘कॅश अॅण्ड कॅरीची रक्कम’ एजन्सीच्या खिशात : सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची पळापळ

पिंपळे निलख – गॅस सिलिंडर घरपोच देणे गॅस एजन्सींना बंधनकारक असतानाही पिंपळे निलख येथिल वंदना गॅस एजन्सींकडून या नियमाचे पालन होताना दिसत नाही. ग्राहकांना स्वत: गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेऊन यावा लागतो. ग्राहकाने एजन्सीमधून सिलिंडर आणला तर ‘कॅश अॅण्ड कॅरीचे’ 18 रुपये 50 पैसे परत मिळण्याचा अधिकार ग्राहकांना असताना एजन्सीकडून या नियमाला सोयीस्कररित्या बगल दिली जात आहे. एजन्सी कॅश अॅण्ड कॅरीची रक्कम कमी करत नाही. यामुळे सर्रास लुट सुरू असल्याचे दिसून येते.

 

गॅस सिलिंडर हा जीवनाश्‍यक वस्तूंपैकी एक आहे. गॅस सिलिंडर वेळेवर नाही मिळाला तर स्वयंपाक करणे अवघड होते. त्यामुळे गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. गॅस कंपन्यांकडून आता ऑनलाईन बुकींगद्वारेच नोंदणी घेतली जाते. त्यानंतर गॅस सिलिंडरचे वितरण ग्राहकांच्या घरी केले जाते. गॅस कंपन्यांच्या आदेशानुसार गॅस वितरण एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलिंडर देणे बंधनकारक आहे. घरपोच सिलेंडर मिळणे हा ग्राहकांचा अधिकारच आहे. मात्र, काही गॅस एजन्सीकडून गॅस सिलिंडर घरी देण्यास टाळाटाळ केली जाते. सिलिंडर आज हवा असेल तर ऑफिसला येवून सिलिंडर घेऊन जा, अशी उत्तरे एजन्सीमधून दिली जातात.

 

सिलिंडर गरजेचे असल्याने ग्राहक एजन्सीमधून सिलिंडर घेऊन जातात. अशावेळी एजन्सीने संबंधित ग्राहकाला 18 रुपये 50 पैसे देणे बंधनकारक आहे. ग्राहक स्वत: सिलिंडर कॅश अॅण्ड कॅरी करत असेल तर त्याला ही रक्कम एजन्सीने देणे बंधनकारक आहे. मात्र, याचे पालन एजन्सीकडून होताना दिसत नाही. या नियमाची बहुतेक ग्राहकांना माहिती नसल्याने एजन्सी चालकांचे फावते. शहरात ग्राहक स्वत: सिलिंडर घेऊन जाण्याचे दररोजचे प्रमाण काही शेकडो आहे. यावरून महिन्याला हजारो रुपये गॅस एजन्सी चालकांच्या खिशात आपोआप जमा होतात. ही एक प्रकारची लुटच आहे.असे मत रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव राजू काळे यांचे आहे.लवकरच शहरातील सर्व एजन्सीची माहिती अधिकारात माहिती घेऊन जनहित याचिका करणार आहे असेही म्हणाले.

बिग ब्रेकिंग न्यूज – बीड जिल्ह्याला मोठा धक्का ! आणखी १३ जण कोरोना पॉझिटिव्ह

error: Content is protected !!