लॉकडाऊनमुळे घरीच लग्न सोहळा
भिवंडी, मिलिंद जाधव – कोरोणा चा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच ३ मे पर्यत लॉकडाऊन आहे.व हा लॉकडाऊन कधी पर्यत संपेल हे सांगु शकत नाही. म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा, बाळाजीनगर येथील नयन नवशा भोईर यांनी आईवडिलांच्या उपस्थित माक्स बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून घरच्याघरी आपला विवाह सोहळा पार पडला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
देशात संचारबंदी कायदा कलम १४४ लागु केल्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकं जमु शकत नाहीत. म्हणून नयन भोईर हे इंजीनीयर असुन त्याची होनारी पत्नी प्राची ही संगणक प्राध्यापिका आहे. दोघे ऊच्चशिक्षीत असल्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता.व समाजामध्ये एक सामाजिक संदेश जावा म्हणून आपले लग्न साध्या पद्धतिने करून सरकारी नियमांचे पालन केले आहे. त्याच उरलेल्या पैशानी मुंबई नाशिक हायवे येथील बिगारी लोकांना मदत करुन तेथील निराधारांना १ वेळेच जेवन व बेघर असलेल्या नागरिकांना धान्य वाटप करून सुद्धा या नवविवाहित जोडप्याने सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. म्हणुन भोईर परिवारांकडे कौतुकाने बघितलं जात आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करुन पैश्यांची नासाडी करणाऱ्यांना ही चपराक असुन. समाजासाठी काहीतरी करावं म्हणून नवदापत्यांनी घेतलेला निर्णयाचं कौतुक होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा