लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान , बँकांचे कर्ज वसुलीसाठी त्रास देण्याचे काम

0 111

नेवासा, अमोल मांडण – कोरोनाच्या या महामारीत सर्वसामान्य व्यापारी भरडला जात आहे. आज घडीला छोटे-मोठे व्यवसायिक कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून व्यवसाय बंद करून घरी बसलेला आहे. त्यांना केंद्र व राज्य सरकार या कोणत्याही सरकारकडून मदतीचा हात मिळालेला नाही.त्याउलट ज्यांनी ज्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहेत.त्या-त्या बँकांनी कर्ज वसुलीसाठी त्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे.अशा वेळेस सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी बघायचे कोणाकडे दोन महिने झाले सर्वसामान्य व्यापारी हा आपला व्यवसाय बंद करून घरात बसला आहे.तरीही कोणत्याही सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा झाली नाही. ज्या पण घोषणा झाल्या त्या नुसत्या कागदावरच राहिल्या सर्वसामान्य वर्गाला मोफत गहु व तांदुळ महिन्याचा मंजूर करण्यात आला.तो ही खाण्यालायक नव्हता. आता सर्वसामान्य व्यापारी एकच आशा लावून बसलेला आहे,की एक जूनला तरी सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचा काहीतरी निर्णय घेईल व त्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येईल हीच अपेक्षा सर्वसामान्य व्यापारी वर्गाला आहे.

आज घडीला दोन महिन्यापासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे घरात बसून आहे. त्यात एक जून नंतर सरकारने जरी लॉकडॉऊन उघडले.तरी आमच्या सलुन व्यवसायला परवानगी देणार नाही.कारण सरकारचा एकच गैरसमज आहे, की कोरोना विषाणु हा फक्त सलून या व्यवसायाच्या माध्यमातूनच वाढतो.त्यामुळे आम्हा सलून व्यवसायिकांना आता रस्त्यावर बसूनच व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
सुदर्शन औटी, सलुन व्यवसायिक

सध्या सरकारकडून कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला.हा फक्त व्यापाऱ्यांनाच आहे का आणि सरकारकडुन ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी सुट दिली आहे. आज घडीला ऑनलाईन व्यवसाय चालू असल्यामुळे मोबाईल विक्रेता दुकानदारांना यामुळे खूप मोठा फटका बसणार आहे. ऑनलाइन व्यवसायामुळे आधीच सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी सरकारने ऑनलाईन व्यवसाय करण्यावर सुद्धा बंदी आणायला पाहिजे होती. त्यात सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देऊन त्यांना पोसत आहे. आणि सर्वसामान्य नागरिकाला मरणाच्या दारात आणून उभा केला आहे.हा दुजाभाव नाही तर काय आहे.
अनिल परदेशी, मोबाईल विक्रेता

लोकडाऊनमुळे सर्वसामान्य व्यापाराचे प्रचंड नुकसान होत असताना सरकर बिनधास्तपणे ऑनलाइन विक्रीला परवानगी देत आहे.त्यात प्रत्येक क्षेत्रातली वस्तू ऑनलाईन मागवली जात आहे.त्यामुळे सर्वसामान्य पासून तर श्रीमंता पर्यंत सर्व नागरिक ऑनलाइन खरेदी करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यापारी भविष्यात आत्महत्याही करू शकतो.त्यामुळे सरकार सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
– बापू कुटे, कापड व्यावसायिक

error: Content is protected !!