परभणी, प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय लोगो (बोधचिन्ह) निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या लोगो (बोधचिन्ह) निर्मिती स्पर्धेचा कालावधी हा दि.३० सप्टेंबर २०२० पर्यंत असून स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत.
तयार केलेला लोगो हा पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयावर आधारित असावा तसेच बोध वाक्य हे मराठीतूनच असले पाहिजे, या स्पर्धेत विध्यार्थी, व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील, लोगो अंतिम करण्याचे अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील.
सहभागी स्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी तसेच स्पर्धकाची पूर्ण माहिती जसे कि, पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक इ माहिती directorwsso@gmail.com आणि iecwsso@gmail.com या मेल आयडी वर पाठवण्यात यावी. ज्या बोधचिन्ह आणि बोधवाक्याची निवड होईल त्यांना रुपये ५००००/- एवढे बक्षीस राज्य स्तरावरून देण्यात येईल. दि.३० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.०० वाजे पर्यंत आलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाणार आहे.
स्पर्धे बाबत अधिक माहितीसाठी स्वच्छ भारत मिशन कक्षातील माहिती,शिक्षण व संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड 9975101825 यांच्याशी संपर्क साधण्यात यावा