वडवणीत बिडिओ – पदाधिकाऱ्यांत खडाजंगी, अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली
वडवणी,प्रतिनिधी :- शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या योजना सर्वसामान्यांसाठी येतात त्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतरही मान्यतेला विलंब कार्यारंभ आदेश विलंबाने देणे यासह इतर कारणामुळे गत काही दिवसापासून वडवणी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता .यात अखेर मंगळवारी बीडिओ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
विकास कामांना मान्यता का देत नाहीत, अशा सवाल पदाधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर बीडिओ कांबळे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला हाता. बीडिओवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात ग्रामपंचायतला निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती यामध्ये फवारणी ,मास्क, सँनेटायझर्स ,औषध,धुर फवारणी, करावयाची होती याबरोबरच वेगवेगळ्या विकास कामांसाठी निधी आलेला असताना त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, यामध्ये अपहार होत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्या सर्व कामाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारीही अनभिज्ञ आहेत त्या विषयी माहिती ती मागितल्यानंतर बीडिओ कडून ही माहिती दिली जात नाही यावर पदाधिकाऱ्यांनी काही कामे योजना मंजूर करण्यास सांगितल्यास ते नियमात बसत नाही असे कारणे दाखवायचे प्रकार सुरू असल्याने मंगळवारी बैठकीत शाब्दिक चकमक झाली यानंतर सभापती अंजनाताई बळीराम आजबे ,उपसभापती श्रद्धा सुमित उजगरे ,सदस्या विमल ताई गणेश शिंदे व सदस्या सौ राणूबाई सुखदेव यांनी बीडीओ यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
घरकुलांचा प्रस्तावाला विलंब..
शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये घरकुल मंजूर केले जाणार आहे त्यामध्ये नगरपंचायत नगरपरिषद व पंचायत समिती मार्फत प्रस्ताव दाखल करणे अपेक्षित आहे वडवणी नगरपंचायतचा प्रस्ताव वेळी सादर झाला परंतु पंचायत समितीकडून हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नव्हता यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून प्रस्ताव उशिरा दाखल केला सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही विनंती केली असून त्यानंतर आता वडवणी तालुक्यातील बेघरांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
पंचायत समितीचे पदाधिकारी अधांतरी..
पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी कार्य करतात परंतु वडवणी पंचायत समितीत पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला यावर बीडिओ यांनी हि आक्रमक पवित्रा घेतला आहे व जे अधिकार आम्हाला आहे त्यानुसार कारवाई सुरू आहे असे त्यांचे म्हणणे होते परंतु पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची कामे प्राधान्याने व्हावेत असा आग्रह पदाधिकाऱ्यांचा होता.
बैठका मधील ठरावावर कारवाईच होत नाही..
पंचायत समिती सदस्य सभापती व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यापूर्वी ठराव घेण्यात आले होते परंतु त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे सदस्यांच्या लक्षात आले त्यानंतर हे सर्व रेकॉर्ड काढून एका-एका कामा विषयी आढावा घेणे सुरू केले असता त्यातील बहुतांशी कामे झालीच नसल्याचे समोर आले यावर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला दरम्यान याच प्रश्नावर बिडिओ कांबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही.
पेट्रोल @ ९ ० रुपये लिटर सामान्यांचे कंबरडे मोडले
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});