वारकरी विद्यार्थ्यी आणि कुटुंबाना भाजीपाला वाटप
हभप रामदास बाबा कबीर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वाटप
आळंदी देवाची, प्रतिनिधी – आळंदी शहरातील वारकरी शिक्षण देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना तथा वारकरी कुटुंबाना सदगुरु हभप रामदास बाबा कबीर यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त कळंब ग्रामस्थ ता.आंबेगाव, जि.पुणे, यांच्या वतीने संपूर्ण भाजीपाला देण्यात आला आहे यावेळी संत कबीर महाराज मठाचे प्रमुख हभप चैतन्य महाराज कबीरबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप पंडित महाराज क्षीरसागर, भारतीय जनता पक्षाचे किसान आघाडीचे सरचिटणीस हभप संजय महाराज घुंडरे, उद्योगपती शुभम मेहरा, राजेशजी मेहरा तसेच विविध वारकरी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी हभप संजय महाराज घुंडरे हे म्हणाले कि श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण घेणार विद्यार्थी आणि महाराज मंडळी वास्तव्यास आहे, कोरोणाचे संकट निर्माण झाल्याने या विद्यार्थ्यांना मधूकरीसाठी आसपास च्या गावात जातायेत नव्हते या सर्व विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ नये म्हणून आळंदी शहरातील हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, हभप पंडित महाराज क्षीरसागर आणि आळंदी शहरातील अनेक महाराज मंडळी यांनी दिलेल्या आवाहनला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून दानशूर व्यक्तींनी समक्ष आप आपल्या परिने जमेल तेवढा किराणा माला तसेच भाजीपाला उपलब्ध करून दिली महाराष्ट्रातून सुध्दा काहीही अर्थिक स्वरुपात मदत केली या वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मदत केली.
उद्योगपती शुभम मेहरा म्हणाले की आळंदी शहरात अश्या अनेक वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आहेत यांना कसलेही मदत लागली तर मेहरा परिवार कायम तुमच्या बरोबर आहे.