व्यावसायिकाचा निर्घुण खून करून फरार झालेले आरोपी शिताफीने ताब्यात
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर यांची संयुक्त कारवाई
पुणे – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह खेड शिवापुर परिसरात गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे मोसिन शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की (दि १२) रोजी नऱ्हे पुणे शहर येथील एका व्यावसायिकाचा खून करून फरारी झालेले आरोपी संतोष रामचंद्र नाक्ती राहणार- गावडदरा तालुका हवेली जिल्हा पुणे वय -२८ व सुधीर राजाराम कामठे राहणार- कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे वय -२४ हे दोन्ही आरोपी कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी एका शेतामध्ये झोपडीवजा घरांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती.
सदर बातमी मिळाल्यानंतर सदर माहिती त्याच परिसरामध्ये आरोपींच्या शोधात असलेले सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याशी संपर्क करून त्यांचा पथकास घेऊन सदर आरोपींना माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले सिंहगड रोड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, पोलीस नाईक विशाल भोरडे, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे डीबी पथक यांनी केली.