शब्दराजचा दणका… सेलु नगरपालीकेने दिल्या व्यापाऱ्यांना नोटीसा
सेलू ,दि 02 (प्रतिनिधी)ः
सेलु शहरात नाल्या तुंबल्याने पाणी दुकानात,रस्त्यावर घुसल्याबाबत दैनिक शब्दराज मध्ये बातमी प्रकाशीत होताच सेलु नगर पालीकेने व्यापाऱ्यांना नोटीसा काढुन दुकानासमोर असलेले ओटे,ढापे काढुन घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिंतुर-सेलू मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींना सेलु शहराचा विसर पडल्याचे चित्र मागील काही दिवसाासून दिसत आहे.सर्वाधीक लक्ष जिंतुर आणि परभणी शहराकडे असल्याने सेलु करांच्या मागण्याकडे कोण पाहील असा प्रश्न सेलुकरांना पडला आहे,तसेचसेलू शहरात गल्ली- बोळात रस्ता नाही, जागोजागी कचऱ्याचे ढिगार आहे, पावसाळा सूरू होताच अनेकांच्या दूकानात घरात पाणी जात आहे, सेलू शहरातील मशनरी लाईन या नालीचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून सूरू आहे. या ठिकानी पाऊस पडताच दूकानात घरात नालीचे पाणी घूसते अशा समस्या असताना लोकप्रतिनिधींनी सेलुकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे अशी बातमी दैनिक शब्दराजने प्रकाशीत केल्यानंतर पालीकेच्या मुख्याधीकाऱ्यांनी नोटीस काढत व्यापाऱ्यांनी आपआपल्या दुकानासमोरील ओटे,नालीवरील ढापे काढुन घेण्याचे आदेश दिले आहेत.नालीवरील ढाप्यामुळे नालेसफाईला अडचण होत आहे.त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने नालेसफाई करण्याची गरज आहे.त्यामुळे ताक्ताळ ढापे काढावे असे आदेश पालीकीने काढले आहेत.