शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र बैठक,सहा महिण्यात विकास कामे होतील – आ. सोळंके

0 224

माजलगांंव, प्रतिनिधी: – येथील नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाउस न्यायालयीन कोठडीत असुन सतत तिन महिणे जेलमध्ये असल्याने जिल्हाधिकारी यांनी हे पद रिक्त केले असल्याने रिक्तपदी भाजपच्या उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार आज दि. ७ मंगळवारी देण्यात आला. शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र आले असुन सहा महिण्यात विकास कामे मार्गी लागतील असा विश्वास आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी व्यक्त केला.

येथील नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाउस ४ मार्च पासुन आजपर्यंत तीन महिणे २३ दिवस न्यायालयीन कोठडीत असल्याने महाराष्ट् नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमचे कलम ५६२ अन्वये पालिकेच्या नगराध्यक्षपदी परवानगी न घेता एकावेळी तीन महिण्यापेक्षा अधिक मुदतीत गैरहजर असल्याने सहाल चाउस पालिकेचे नगराध्यक्ष असण्याचे बंद झालेले आहे. असे जिल्हाधिकारी यांनी घोषीत केल्यानुसार व शासनाच्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर सदर रिक्त नगराध्यक्ष पद प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने रिक्त ठेवणे संयुक्तीक ठरणार नाही आणि चाउस यांनी पदभार दिलेला नसल्याने उपनगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार तातडीने स्विकारावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार आज मंगळवारी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, प्रभारी मुख्याधिकारी विशाल भोसले, छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप, बाबुराव पोटभरे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, अच्युत लाटे, नासेर पठाण यांचेसह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी सभागृहात पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना आमदार सोळंके म्हणाले की, मागील साडेतिन वर्षांच्या कार्यकाळात शहरवासीयांची मुलभुत कामे रेंगाळली होती. कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध असतांना पिण्याच्या पाण्यासह रस्ते, नाले आदी प्रश्नी नागरिक त्रस्त होते. कायदेशिर प्रक्रिया राबवुन आगामी काळात सहा महिण्यात शहरवासीयांच्या जिव्हाळ्याची असणारी सर्व कामे मार्गी लागतील. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय मतभेद विसरून सर्वपक्षीय आम्ही एकत्र आलो असुन या १९ नगरसेवकांनी समर्थन दिलेले आहे. असा विश्वासही आमदार सोळंके यांनी व्यक्त केला. यावेळी छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप, बाबुराव पोटभरे, अशोक डक, अच्युत लाटे, नासेर पठाण, मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे ८ अन् नगराध्यक्षपदी भाजपाचा थाट ! आ.सोळकेंचे वाटते भाजप प्रेम ज्येष्ठ नेत्यांच्या पचनी पडणार का ?

 

error: Content is protected !!