शहर दोन भागात न विभागता संपूर्ण शहर एक दिवसाआड बंद करावे
मनमाड, प्रतिनिधी – कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर शहरात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने दिला. याच अनुषंगाने शहर दोन भागात न विभागता संपूर्ण शहर एक दिवसाआड बंद करावे, असे निवेदन शहर व्यापारी वेल्फेअर असोसिएशन कडून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांना देण्यात आले.
कोरोना महामारीसाठी शासनाने नविन नियमावली जाहीर केली आहे . त्यामुळे मनमाड शहरातील उत्तरेकडे व पूर्वकडे दर्शनी बाजू करुन असलेली दुकाने सोमवार , बुधवार , शक्रवार तसेच दक्षिणेकडे व पश्चिमेकडे दर्शनी बाजु असलेली दुकाने मंगळवार , गुरुवार , शनिवार रोजी सुरु राहतील अतः नविन नियम लागु केलेला आहे . शासनाच्या या नविन नियममामुळे शहरातील व्यापारी व ग्राहक बांधवामध्ये संम्रभ निर्माण झालेला आहे . रस्त्यावर ग्राहकची गर्दी वाढत असल्यामुळे शासनाचे कर्मचारी तसेच व्यापारी बांधवांनासुध्दा त्यांना आतरणे कठीण होत आहे . ज्या उद्देशाने शासनाने नदिन नियमावली जाहीर केली आहे तो उद्देश सफल होणार नाही . त्याचा उलट परीणाम होऊन कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा जास्त धोका निर्माण होणार आहे . शहरात कोरोनाचा धोका कमी करावयाचा असेल आणि व्यापारी व ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संम्रभ करावयाचा असेल तर संपूर्ण शहर दोन भागांमध्ये न विभागता संपूर्ण मनमाड शहर एक दिवस सोडून बंद करावयास पाहीजे . त्यामुळे ग्राहकांची रस्त्यावरील गर्दी कमी होऊन व्यापारी व शासनाच्या कर्मचारी यांच्यावर असलेला कामाचा ताण पण कमी होईल . व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका पण कमी होईल . असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून या निवेदनावर राजेंद्र पारिक, सुरेश लोढा ,राजकमल पांडे, मनोज जंगम ,अरुण सोनवणे आदिंनी स्वाक्ष-या केल्या आहेत .
शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात; कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार