शाळा व्यवस्थापन समितीत शैक्षणिक वर्षाची दिशा एक दिवसाड वर्ग अध्यापन
माजलगांव,प्रतिनिधी :- कोरोनाने मुळे नवीन शैक्षणिक वर्षाला ब्रेक लागला आहे शाळा सुरु झाली खरी पण ती गुरुजींची विद्यार्थ्यांची शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न निर्माण झाला असून शासनाचे कोणतेच स्पष्ट सूचना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जून ला झाली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या शाळेत बैठका पार पडल्या त्यात ९ वी आणि १० वी च्या वर्गाचे प्रत्यक्ष अध्यापन सर्व खबरदारी घेऊन १ जुलै पासून सुरु करण्याचे निर्णय बहुतांश शाळेत घेण्यात आला .
विद्यार्थी आणि शाळा यांचा संबंध १९ मार्च पासून प्रत्यक्ष नाही , याकाळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवाह राहण्यासाठी तालुक्यात वर्क फ्रॉम होम हि संकल्पना उपयुक्त ठरली सजग पालकांनी घरीच अभ्यास करून घेण्यावर भर दिला आणि त्याला शिक्षण विभागाने देखील प्रतिसाद दिला.रोजच्या रोज अभ्यास मिळत असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कायम राहिले .१९ मार्च पासून लॉकडॉऊन जाहीर झाल्याने शाळा बंद झाल्या प्राथमिक विभागाच्या वतीने गत वर्षीच्या द्वितीय सत्र परीक्षा देखील रद्द करण्यात आली .
सरासरी नुसार गुणदान देण्यात आले.यावर्षी १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात देखील झाली पण शाळा सुरु बाबत ठोस भूमिका न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला . शाळा सुरु झाली गुरुजी देखील शाळेत आले पण प्रतीक्षा मात्र त्यांना बोलणाऱ्या पाखरांची.यंदाच्या वर्षी शाळा आणि तिचे स्वरूप परिपत्रकानुसार टप्प्याने सुरु करण्यात येतील असे दिसून येते . शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कोणत्या वर्गाची शाळा कधी सुरु होईल याबाबत चर्चा करण्यात आल्या.त्यानुसार शैक्षणिक वर्ष कार्यनित्व होईल.व्यस्थापन समितीच्या बैठक शाळा स्तरांवर घेण्यात आलेल्या आहेत.यामध्ये विध्यार्थी पट संख्या वर्ग खोल्याचे निर्जंतुकीकरन , स्वछता , आरोग्य हमीपत्र , सलग तीन तास अश्या स्वरूपाचे निर्णय बहुतांश शालेय समितीच्या बैठकीत घेण्यात आले .
असे असू शकेल वेळापत्रक
जुलै महिना – ई.९ वी आणि १० वी
ऑगस्ट महिना – ई .६ वी ते ८ वी
सप्टेंबर महिना – ई .३ री ते ५ वी
याकाळात हे वर्ग एक दिवसाड सुरु होऊ शकतात .
पुस्तकांचे वितरण
आगामी शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासाचे पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले आहेत .शाळा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी शाळेने पुस्तके मिळवून ती २२ आणि २३ जून रोजी विद्यार्थ्यांना वितरित केली .
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका
आगामी शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी , विद्यार्थी सुरक्षितता , स्वछता , वैयक्तिक स्वछता याविषयावर अनेक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठक घेण्यात आल्या आहेत.त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षाची दिशा ठरवण्यात येत आहे.