शिक्षक हेच समाजाचे खरे स्त्रोत- भावनाताई नखाते

पाथरी येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा

0 125

पाथरी,दि 05 (प्रतिनिधी)ः
शिक्षकांनी शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागातील मुलांना घडवण्याचे काम केले आहे व ते करत आहेत तळागळातीळ समाजाचे उच्चाटन हेच खरे शिक्षणाचे ध्येय असून ते साध्य करणाऱ्या शिक्षकांचा आपण सन्मान केला पाहिजे असे भावनताई नखाते यांनी प्रतिपादन केले. दि.05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे अवचित्य साधून शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे परभणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने पाथरी तालुका व परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद व खाजगी शैक्षणिक संस्था मधील 40 शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.भावनाताई नखाते अध्यक्ष परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश राठोड गटशिक्षणाधिकारी पाथरी, आर.एम.टेंगसे केंद्र प्रमुख पाथरी,जी.टी. खंदारे निवृत्त मुख्याध्यापक पाथरी,बी.के.काकडे तालुका अध्यक्ष शा. शी. संघटना पाथरी ,सुभाष चिंचाने मुख्याध्यापक माळीवाडा,बजरंग गील्डा जी.प.प्रशाळा बोरगव्हान,प्राचार्य के.एन.डहाळे,मुख्याध्यापक एन.इ.यादव,धनंजय भागवत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणी,मिराताई सरोदे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी,रेखाताई मनेरे शहर अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी मंगलताई सुरवसे अधिमान्यवर उपस्थित होते,
सुरेश पवार ,अभंग खाडक,हनुमान जाधव ,सोमनाथ डोंगरे,रुक्मिणीबाई जाधव या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी प्रत्येनिधिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी व आभार प्रदर्शन बळीराम चव्हाण यांनी केले.

error: Content is protected !!